व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पद नव्हे काय ?

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी  करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’

हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण आहे का ?

‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’ 

नित्य असा धर्म आणि सतत पालटणारा बुद्धीप्रामाण्यवाद !

‘धर्मात चिरंतन सत्य सांगितलेले असल्यामुळे पुढच्या पिढीमुळे आधीची पिढी मूर्ख ठरत नाही. याउलट बुद्धीची कक्षा जशी रूंदावत जाते, तसे आधीच्या पिढीतील बुद्धीवान ‘मूर्ख’ किंवा ‘सनातनी’ समजले जातात !’

‘देशद्रोही’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी देशद्रोहीच होत !’

शासनकर्ते असे असावेत !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’

उथळ विचारांचे अहंकार असलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘आंधळ्यांना स्थूल जग दिसत नाही, तसे साधना न करणार्‍यांना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्म जग दिसत नाही. आंधळा ‘दिसत नाही’, हे मान्य करतो; पण बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म जग असे काही नसते’, असे अहंकाराने म्हणतात !’

जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यामुळे हिंदूंची झालेली अतोनात हानी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा उडाली. जात्यंधांमुळे हिंदूंची आपसात फूट झाली. त्यामुळे भारतात बहुसंख्य असूनही ते इतर धर्मियांकडून आणि नक्षलवाद्यांकडून मार खात आहेत !’

साधनेचे महत्त्व !

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले