विविध विषयांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

. . . परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली धर्मशक्तीच हिंदु राष्ट्र स्थापन करील !

या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

खरे प्रदूषणनिवारण करायचे असेल, तर आधी मनातले प्रदूषण दूर करा !

. . . प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुले असंस्कारी असल्याचा हा आहे परिणाम !

‘मातृदेवो भव। पितृदेवो भव।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांनो, ‘सेवेसाठी घेतलेले साहित्य सेवा झाल्यानंतर जागेवर ठेवणे’, ही साधना आहे !

साधकांनी सेवेसाठी लागणारे साहित्य सेवा पूर्ण झाल्यानंतर जागेवर ठेवल्यानंतरच त्यांची सेवा परिपूर्ण होते.

स्वत:च्या झोपेऐवजी इतरांचा विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘मार्च २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या खोलीच्या वरच्या मजल्यावर बांधकामाची दुरुस्तीची मोठा आवाज करणारी कामे चालू होती आणि
त्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना खूप थकवा असल्यामुळे त्यांचा दिवसाही विश्रांतीचा काळ अधिक होता तरी, त्यांनी ‘आता मी झोपत आहे. कामगारांना काम नंतर करण्यास सांगा’, असे सांगितले नाही. त्या आवाजातच ते झोपत होते.’

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध पंथ, तर कुठे अनादि हिंदु धर्म !

गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खोलीत बाहेरील गरम हवा येऊ नये; म्हणून खिडक्या लावण्याबरोबर पडदाही लावून घ्या !

‘उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील हवा इतकी गरम असते की, खिडक्यांच्या काचा गरम होऊन त्यानेही खोलीतील उष्णता थोड्या प्रमाणात वाढते. यासाठी खिडकी बंद केल्यावर खिडकीचा पडदाही लावल्यास ती उष्णता उणावते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

मनाला निरुत्साह आल्यास नामजप अधिक भावपूर्ण करून उपास्यदेवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा !

देशाला विनाशाकडे घेऊन जाणारे व्यक्तिस्वातंत्र्यवाले !

‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले