हिंदु समाजाकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक !

कोल्हापूर – २८ एप्रिलला एका मुसलमान व्यक्तीने रुईकर वसाहत येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीसमोरील जागेत नमाजपठण केले होते. या संदर्भात हिंदु समाजातील अनेक तरुण-तरुणी यांनी एकत्र येऊन गोमूत्र शिंपडून या परिसराची शुद्धी केली, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. ज्या व्यक्तीने नमाजपठण केले त्याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे.