संतप्त ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग !
कणकवली : तालुक्यातील शिरवल गावातील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी गावात प्रचारासाठी येऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्याचे काम चालू केले.
शिरवल गावात जाणार्या मुख्य रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे झाले नव्हते. यावर्षी रस्त्याच्या कामासाठी निधी संमत झाला; मात्र पावसाळा ताेंडावर आला, तरीही काम चालू झाले नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ‘निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने गावात येऊ नये’, अशी भूमिका घेऊन तसा फलक गावाच्या सीमेवर लावला होता. ग्रामस्थांच्या या भूमिकेनंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता सुतार यांनी त्यांच्या पथकासह गावात येऊन ग्रामस्थ आणि उपसरपंच प्रविण तांबे यांची भेट घेतली अन् रस्त्याची पहाणी केली, तसेच संबधित ठेकेदाराला रस्त्याचे काम तातडीने चालू करण्याची सूचना केली. त्यानंतर रस्त्याचे काम चालू झाले.
संपादकीय भूमिका
|