भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर

बदलत्या युद्धनीतीनुसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी यांनी नवनवीन कल्पना आणि संशोधन यांवर भर देण्याचे आवाहन शेकटकर यांनी केले.

राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

आधुनिक युगात सकस आणि शुद्ध अन्न प्रत्येकाच्या ताटात जाण्यासाठी राहीबाईंचे विचार स्वीकारावेच लागतील, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

आमदार रवि नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे फोंडा येथील आमदार रवि नाईक यांनी ७ डिसेंबर या दिवशी सकाळी आमदारकीचे त्यागपत्र देऊन सायंकाळी फोंडा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबईतील सागरी मार्गाच्या कामांमध्ये घोटाळा !

आशिष शेलार पुढे म्हणाले की, सागरी मार्गाच्या प्रकल्पात मुंबई महानगरपालिका ठरवून अफरातफर करत आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना अवैध साहाय्य केले आहे

राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे

महाराष्ट्रात ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ या जागांवरील निवडणुकांना स्थगिती !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ या दिवशी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यांतील ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ ( obc reservation ) जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे

वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था !

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कायमस्वरूपी रस्ता का करत नाही ? राष्ट्रपुरुषांप्रतीचे कर्तव्य पार न पाडल्याने जाणीव करून द्यावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात २ गुन्हे लपवले !

या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात (जे.एम्.एफ्.सी.) देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नागपूरमधील अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

ज्ञानाचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यानंतर अनेकांचा व्यावसायिक भविष्याकडे ओढा असतो; मात्र त्यापूर्वी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कायद्याचे ज्ञान घेऊन प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्मकार्य चालू ठेवूया ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘हिंदु टास्क फोर्स’च्या वतीने आयोजित ‘कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !