सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड येथील राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यान पार पडले !
सोलापूर – बहुसंख्य हिंदु असलेल्या देशात हिंदूंच्या स्त्रिया सुरक्षित नाहीत. प्रत्येकाच्या घरापर्यंत जिहाद पोचलेला आहे. राजरोसपणे हिंदूंचे धर्मांतर होत आहे. प्रतिदिन नवनवीन उत्पादने हलाल प्रमाणित होत आहेत. भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड येथील राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी २ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
या व्याख्यानामध्ये ३३० हून अधिक जिज्ञासू सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी, तर समितीचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे यांनी ‘हलाल जिहाद’विषयी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.
‘हलाल जिहाद’चा विषय परिचितांपर्यंत पोचवण्यासाठी बैठकांचे आयोजन करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
सनातन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणारे साधना सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग यांमध्ये सहभागी व्हा. तसेच महिला आणि मुली यांनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी, तसेच स्वत:तील आत्मबळ वाढवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे. ‘हलाल जिहाद’ हा विषय आपल्या परिचितांपर्यंत पोचवण्यासाठी विविध ठिकाणी ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करा.
हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखेच ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समितीहिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे. सौंदर्यप्रसाधने वापरण्यास कुराणला मान्यता नसूनही ती हलाल प्रमाणित करण्यात आली आहेत. यावरून हिंदूंना फसवण्याचे किती मोठे षड्यंत्र आहे, हे लक्षात येते. |