सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावण्याच्या प्रदर्शनातील फलकांची सूची आणि त्यांच्या कलाकृती उपलब्ध !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी येणार्‍या जिज्ञासूंना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण ३८ फ्लेक्स फलक उपलब्ध करण्यात येत आहेत.

ज्योतिषशास्त्रीय संशोधनाशी संबंधित सेवेच्या सुसंधीचा लाभ घ्या !

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके, उन्नत साधक आणि संत यांच्या १०० हून अधिक जन्मकुंडल्यांचे संशोधनात्मक विश्‍लेषण करणे.

दैनिक सनातन प्रभातचा ज्योतिर्विज्ञान विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

घरगुती औषधांच्या संदर्भातील माहिती कळवा !

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना घरगुती औषधांविषयी माहिती नसल्याने ‘जरा काही झाले की, आधुनिक वैद्यांकडे जा’, अशी स्थिती आहे. भावी भीषण आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांना घरगुती औषधांची माहिती व्हावी, यासाठी सनातन संस्था प्रयत्नशील आहे.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत : कृषीविशेष विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ जून यादिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारासाठी फलक उपलब्ध !

सनातन संस्था आणि अन्य आध्यात्मिक संस्था यांच्यावतीने साजर्‍या करण्यात येणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांसाठीचे आवश्यक असे प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.

‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक कि चांगली स्पंदने जाणवतात’, याचा अभ्यास करून वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास ती दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय करा !

‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते. तसेच त्या त्रासदायक स्पंदनांमुळे डोके दुखणे, मळमळणे यांसारखे शारीरिक त्रास आणि अस्वस्थ वाटणे


Multi Language |Offline reading | PDF