ओडिशा राज्याच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना ४ मासांचे वेतन आगाऊ मिळणार

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.

सध्याच्या घडीला सर्वांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पोलिसांच्या घरात मुले-पत्नी, आई-वडील आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर किती ताण टाकायचा याचा विचार करायला हवा. काही भागांत लोक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करत आहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत.

मृत कोरोनाग्रस्त महिला नवी मुंबईतील नव्हे, तर मुंबईतील रहिवासी – आयुक्त

‘व्हाट्सअ‍ॅप’वर वाशीतील निवासी कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू ही बातमी प्रसारीत होत आहे, वस्तूतः ही महिला नवी मुंबईतील नसून मुंबईतील गोवंडी येथील होती, असे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेले १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याचे २६ मार्चला स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे देशात दळणवळण बंद करण्यात आल्याने कामासाठी किंवा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर असलेले अनेक जण अडकून पडले आहेत.

ब्रिटनचे पंतपधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण

ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे…..

दळणवळण बंदीच्या काळात कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणी यंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात बंदी नाही ! – कृषीमंत्री दादा भुसे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या आणि दळणवळण बंदी असतांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे……….

भारतात ८०३ कोरोनाग्रस्त रुग्ण, २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.