ब्रिटनचे पंतपधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण

लंडन – ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना याची काही लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. ‘मी सध्या कोरोनाशी  लढा देत असून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून शासनाचे नेतृत्व करत रहाणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या ब्रिटनमध्ये ११ सहस्र ६५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून ५७८ जणांचा मृत्यू झाला आहे.