पाटण (जिल्हा सातारा) येथे शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा ?

शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !

निगडी (पुणे) येथे उद्घाटनाअभावी ‘गदिमा नाट्यगृह’ कुलूपबंद !

नाट्यगृहाचे उद्घाटन सत्ताधारी नेत्यांकडून नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांकडून करून घेणे उचित ठरेल !

लोलये (गोवा) येथील नाल्यातील पाणी जाण्याच्या पाईपमधील गाळ साचल्याची तक्रार ‘ट्विटर’द्वारे नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेकडून गाळ स्वच्छ !

सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) शहरातील श्री देवी महालक्ष्मी मंदिरासह परिसर विकासासाठी सवा कोटी रुपयांचा निधी संमत !

सभामंडपाचे नूतनीकरण, व्यासपीठ, धर्मशाळा बांधकामास हा निधी मिळाला आहे.यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सव !

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सायंकाळी ५ वाजता श्रीशिवतीर्थ, मारुति चौक येथून शोभायात्रा प्रारंभ, सायंकाळी ६.४५ वाजता श्री पशुपतीनाथ मंदिर येथे आरती-पाळणा आणि सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेची अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पडताळणी बंदच !

यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील स्थापत्य अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि कामगार अधिकारी या अधिकाऱ्यांकडून बसस्थानकांच्या स्वच्छतेची वेळोवेळी पडताळणी करण्याची कार्यपद्धती होती. सध्या मात्र ही पडताळणी बंद आहे, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला एस्.टी. महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.

आजपासून गोव्यात ‘जी २०’ आरोग्य क्षेत्र कार्यगटाची दुसरी बैठक !

या बैठकीत ‘हेल्थ ट्रॅक’ अंतर्गत निवडण्यात आलेले आरोग्यासंदर्भातील आपत्कालीन स्थितीला प्रतिबंध तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्य बळकट करणे या विषयांवर प्राधान्यावर चर्चा केली जाणार आहे.

स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ अन्यत्र विक्रीसाठी नेणाऱ्या वजीर मुजावरला अटक !

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी येथे स्वस्त धान्य दुकानातील ३ लाख रुपयांचा तांदूळ (१४ टन) कोल्हापूर येथील बाजारपेठेत अधिक दराने विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकचालक वजीर नजीर मुजावरला बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली आहे.

अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्षे आणि फळबागा यांची मोठी हानी !

काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारी हानी शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.

पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांची ११५ वी पुण्यतिथी असून १६ वा रथोत्सव होणार आहे. पारायण आणि पुण्यतिथी महोत्सव २१ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होत आहे.