सोलापूर येथे समाजकंटकांकडून गोरक्षकाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट !

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ४ एप्रिलला सकाळी अमरावतीच्या दिशेने जाणार्‍या शिवशाही बसला अचानक आग लागली. बसमध्ये १६ प्रवासी होते. प्रवासी, बसचालक आणि वाहक बसमधून उतरल्याने अनर्थ टळला.

पाण्यावर तरंगणार्‍या बाबांना आव्हान देणार्‍या अंनिसची फजिती, अंनिसचे प्रकाश मगरे पाण्यात बुडाले !

प्रसिद्धीमाध्यमांपुढे मात्र अंनिसवाल्यांचा जिंकल्याचा खोटा दावा ! अंनिसचा खोटारडेपणा ! यातून अंनिसवाल्याची वृत्ती दिसून येते.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांचा ‘पी.एम्.पी.’ संचालक मंडळामध्ये समावेश !

पी.एम्.पी.कडून पी.एम्.आर्.डी.ए.च्या परिसरामध्ये ११३ मार्गांवर ४९० बसगाड्यांनी सेवा दिली जाते. ग्रामीण भागात सेवा देण्यामुळे संचालन तुटीमध्ये वाढ होत होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे पाप भारतीय सहन करणार नाहीत ! – आमदार मदन येरावर, यवतमाळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेले कार्य बहुमूल्य आहे, देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. अंदमान कारागृहात त्यांना शिळे आणि अळ्या असलेले अन्न मिळायचे, तरीही त्यांनी राष्ट्रकार्य चालू ठेवले.

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’ – आमदार इकबाल महमूद, समाजवादी पक्ष

महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !

पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव हेडगेवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ते ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसारित केल्याप्रकरणी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पुढील चौकशी चालू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टीचा (मास्क) उपयोग करणे बंधनकारक ! – रूचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वसिद्धता आणि उपाययोजना करण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी सूचना केल्या आहेत.

सतत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती !

सतत पडणारा पाऊस म्हणजे नैसर्गिक आपत्ती समजली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग ५ दिवस पडल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. हा राज्य सरकारचा शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांत मोठा निर्णय आहे.

नगरमध्ये २ गटांत दगडफेक, पोलिसांचा कडक बंदोबस्त !

येथील संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात ४ एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून २ गटांत दगडफेक झाली आहे. या वेळी समाजकंटकांनी २ मोटारसायकल जाळत, स्विफ्ट या चारचाकीची तोडफोड केली. दगडफेकीत ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.