गोवा : हणजुण आणि पेडणे समुद्रकिनार्‍यांवर होणारे ध्वनीप्रदूषण !

समुद्रकिनार्‍यांवर ध्वनीप्रदूषण करणार्‍या आस्थापनांना टाळे ठोकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ! प्रत्येक वर्षी न्यायालयाला का आदेश द्यावे लागतात ? पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय आहे कि अधिकार्‍यांचे आस्थापनांशी साटेलोटे आहे ?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त…

नवरात्रीच्या निमित्ताने ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेस प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहनच्या अर्थात् ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेस १५ ऑक्टोबरला परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

नवरात्रोत्सवानिमित्त पुणे येथे प्रमुख मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत पालट !

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात आले आहेत. महत्वाच्या मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.

पाकच्या मुसलमान क्रिकेटपटूंचे खरे स्वरूप जाणा !

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

जळगाव येथे लावले इस्रायलविरोधी फलक ! 

येथे काही फलकांवर ‘इस्राईल बॉयकॉट’ (इस्रायलवर बहिष्कार) लिहिलेले फलक लावण्यात आले हाेते. पोलिसांनी ते काढून ठेवले. हा प्रकार करणार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईत २ पॅलेस्टाईन समर्थकांना अटक !

इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या २ पॅलेस्टाईन समर्थकांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रुचिर लाड आणि सुप्रीत रविश अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विनाअनुमती आंदोलन करणे, सरकारी आदेशाची अवज्ञा करणे असे आरोप आहेत.

ऐन नवरात्रोत्सवात सांडपाणी आणि अन्य दूषित पाणी पंचगंगेत 

कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला.

श्री दुर्गामाता दौडमध्ये अनुचित प्रकार घडल्यास गुन्हे नोंद करणार ! – पोलीस उपअधीक्षक

वाई शहरात नवरात्रोत्सव आनंदाने साजरा केला जातो. दुर्गोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी.

पुणे येथील ‘ज्यू’ धर्मियांच्या प्रार्थनास्थळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त !

‘इस्त्रायल’ आणि ‘हमास’ या आतंकवादी संघटनेमध्ये चालू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी शहरातील ‘ज्यू’ धर्मियांच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.