कोल्हापूर – नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहनच्या अर्थात् ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेस १५ ऑक्टोबरला परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी नियमित दुर्गादर्शन बससेवेच्या प्रवासी सौ. अर्चना शिंदे, शुभांगी म्हामुळकर, रेश्मा कुदळे यांचे शुभहस्ते बसचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी दुर्गादर्शन प्रमुख सुनील जाधव, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार, लेखापाल अरुण केसरकर यांसह अन्य उपस्थित होते.