भारतात ८०३ कोरोनाग्रस्त रुग्ण, २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(म्हणे) ‘देवस्थानांनी स्वत:ची दानपेटी समाजासाठी उघडी करावी !’ – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्‍यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदीदारांचा हलगर्जीपणा !

शेतमाल खरेदीदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाईंदर येथे संचारबंदीचा अपलाभ घेत गुटखा पुरवणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद

समाजास बाधक ठरणार्‍या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !

शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली

शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.

उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे

शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.

महानगरपालिकेला कोरोनाबाधित रुग्णाची माहिती न कळवणारे ठाणे येथील चाचणी केंद्र (लॅब) ‘सील’

कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती तत्परतेने प्रशासनास देणे, समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. यात निष्काळजीपणा किंवा मनमानीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

‘कोरोना’च्या भीतीने आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना घरमालकांकडून घर रिकामे करण्यासाठी तगादा

देशभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वैद्य आणि पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत………

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील ५७ बंदीवानांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील छोट्या गुन्ह्यांतील ५७ बंदीवानांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या ३ दिवसांत सोडण्यात आले…