पुणे – औंध येथील स्पायसर कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला अनेक दुकानदारांनी अवैधपणे दुकाने थाटली होती. त्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना जमावाने मारहाण केली; मात्र मारहाण केली असली तरीही अतिक्रमण विभागाच्या पथकाने ५० ते ६० सहस्र फुटांचे बांधकाम पाडले. या प्रकरणी जमावाविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (अतिक्रमणाचा गुन्हा करूनही अधिकार्यांना मारहाण करणार्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का ? अशांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक) महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप यांनी अतिक्रमण कारवाई अधिक कडक करणार असल्याचे सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
पुणे येथे पूर नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त नाही !
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !