अंतराळात ३ उपग्रह प्रक्षेपित !
श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ने ‘एस्.एस्.एल्.व्ही.-डी २’ या नवीन ‘स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल’चे श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन लॉन्च सेंटर’ येथून १० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी प्रक्षेपण केले. याच्या १५ मिनिटांच्या उड्डाणात ३ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.
#SSLVD2: #ISRO launched the second developmental flight of its smallest launch vehicle on February 10, 2023, from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. The rocket is carrying three payloads to spacehttps://t.co/du1YwV3Si6
— ABP LIVE (@abplive) February 10, 2023
या उपग्रहांमध्ये अमेरिकेचे ‘जानुस-१’, चेन्नईच्या ‘स्पेस स्टार्ट-अप’चे ‘आझादी सॅट-२’ आणि ‘इस्रो’चे ‘ईओएस्-७’ यांचा समावेश आहे. ‘एस्.एस्.एल्.व्ही.-डी २’ने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १५ मिनिटांपर्यंत उड्डाण केले. तेथे या रॉकेटने ४५० किमी दूरच्या कक्षेत उपग्रह सोडले.