Nitin Gadkari On Politics : राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण्यांची मानसिकता स्पष्ट केली. ते येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

भाजप आणि राष्‍ट्रवादी यांच्‍या नेत्‍यांनी केली शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी !

भाजप आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी शपथविधीच्‍या सिद्धतेची एकत्रित पहाणी केली. विशेष म्‍हणजे या वेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्‍थित नव्‍हता.

एकनाथ शिंदे अप्रसन्‍न हा अपप्रचार – दीपक केसरकर, प्रवक्‍ते, शिवसेना

शिवसेना आणि भाजप हे ३० वर्षांपासून एकत्र निवडणूक लढले आहेत. आमची विचारधारा एकच आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही.

मंत्रीपदाच्‍या शर्यतीमधील भाजपच्‍या नेत्‍यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

मंत्रीपदाच्‍या शर्यतीत असलेल्‍या भाजपच्‍या नेत्‍यांनी २ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्‍थानी भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकारांचा अर्थसाहाय्याचा प्रश्न नवीन सरकारने तातडीने सोडवावा ! – गुरुदास गवंडे, गणेशमूर्तीकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकरांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून आर्थिक साहाय्य मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले होते.

गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील वाहनचालकाकडून ७ वेळा अपघात झाल्‍याची माहिती समोर !

आरोपीला आधीच्‍याच गुन्‍ह्यात कठोर शिक्षा झाली असती, तर गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील मृत्‍यू टाळता आले असते ! दोषी आढळल्‍यानंतरही कोणतीही कारवाई न करणार्‍या दायित्‍वशून्‍य अधिकार्‍यांनाही दोषी ठरवून त्‍यांच्‍यावर कारवाई करायला हवी.

विधानसभेतील भाजपचे गटनेते ठरवण्‍यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्‍ती !

५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर मुख्‍यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्‍थित रहाणार आहेत.

महाराष्‍ट्रात सायंकाळी वाढलेल्‍या मतदानाची टक्‍केवारी योग्‍यच ! – निवडणूक आयोग

या निवडणुकीत राज्‍यात १ लाखाहून अधिक मतदानकेंद्रे होती. तेथे सायंकाळी ६ पर्यंत आलेल्‍या नागरिकाचे उशिरापर्यंत मतदान घेण्‍यात आले. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात सायंकाळी वाढलेल्‍या मतदानाची टक्‍केवारी योग्‍यच आहे, अशी भूमिका महाराष्‍ट्राचे मुख्‍य निवडणूक अधिकारी एस्. चोक्‍कलिंगम् यांनी स्‍पष्‍ट केली आहे.

देशाच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाच्‍या पदांवर चारित्र्यवान व्‍यक्‍ती असल्‍या पाहिजेत ! – अविनाश धर्माधिकारी, चाणक्‍य मंडल परिवार

पाकिस्‍तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत असलेला भ्रष्‍टाचार हा भारताच्‍या सुरक्षिततेतील सर्वांत मोठा धोका आहे. भ्रष्‍ट चारित्र्य आणि अमर्यादित स्‍वार्थ यांमुळे देशाची अतोनात हानी झाली आहे.

संस्थानकालीन आचरे गावची ‘गावपळण’ १५ डिसेंबरला होणार

तालुक्यातील संस्थानकालीन आचरे गावची ‘गावपळण’ प्रत्येक ३ ते ५ वर्षांनी होत असते. या वर्षी श्री रामेश्वरदेवाने दिलेल्या कौलानुसार १५ डिसेंबरला ‘गावपळण’ होणार आहे.