Donald Trump Warns Hamas : २० जानेवारी २०२५ पूर्वी ओलिसांना सोडा अन्यथा विध्वंस करेन !

अमेरिकेचे नवनिर्चाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची हमासला चेतावणी

अमेरिकेचे नवनिर्चाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना २० जानेवारी २०२५ या दिवशी माझ्या होणार्‍या राष्ट्राध्यपदाच्या शपथविधीपूर्वी सोडा, नाहीतर मध्य-पूर्वेत विध्वंस करेन, अशी चेतावणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी हमासला दिली आहे.

आतापर्यंत कुणालाही मिळाली नाही, अशी शिक्षा करणार !

ट्रम्प यांनी धमकी देतांना पुढे म्हटले की, जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत, त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी शिक्षा असेल. जर त्यांनी या काळात योग्य कार्यवाही केली नाही, तर अमेरिका अशी शिक्षा देईल, जी आजपर्यंत कुणालाही मिळाली नाही.

गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील हमास या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलच्या सीमावर्ती भागांत आक्रमण करून अनेकांना ठार केले होते. तसेच अनेकांना ओलीस ठेवले. इस्रायलने त्यांच्या विरोधात युद्धा पुकारल्यानंतर त्यांतील काही नागरिकांची, विशेषतः महिलांची सुटका करण्यात आली होती. तरीही २५० पेक्षा अधिक नागरिक अजूनही हमासच्या कह्यात आहेत. यामध्ये गाझा पट्टीत १०१ नागरिक ओलीस असल्याची माहिती समोर येत आहे.

संपादकीय भूमिका

‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबवा अन्यथा विध्वंस करू’, अशी चेतावणी भारत बांगलादेशाला कधी देणार ?