उत्तर-पूर्व भारतात हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजीव नाथ, जिल्हाध्यक्ष, हिंदु जागरण मंच, कछार, आसाम

केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…

सरकारने ‘अल्पसंख्यांक’ या संज्ञेची व्याख्या केल्यास सर्व समस्या संपतील ! – मेजर सरस त्रिपाठी, लेखक आणि प्रकाशक, प्रज्ञा मठ पब्लिकेशन

राज्यघटनेत अल्पसंख्यांकांचे महत्त्व वाढवून हिंदूंशी दुजाभाव करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. सरकारने ‘अल्पसंख्यांक’ या संज्ञेची व्याख्या केल्यास सर्व समस्या नष्ट होतील.

समलैंगिकतेला मान्यता दिल्यास भारतातील अनेक कायद्यांवर दुष्परिणाम होईल ! – अधिवक्ता मकरंद आडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, नवी देहली

सर्वाेच्च न्यायालयात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी १५ याचिका प्रविष्ट झाल्या आहेत. या याचिकांमध्ये हिंदु विवाह कायदा रहित करणे, २ पुरुष किंवा २ स्त्रिया यांनी एकमेकांशी केलेले समलिंगी विवाह कायदेशीर करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

कर्नाटक सरकारच्या हिंदुविरोधी निर्णयांच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताच पाठ्यपुस्तकांतून वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारगुरुजी यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच धर्मांतरविरोधी कायदा मागे घेण्याची घोषणा केली.

‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’द्वारे युवकांना भारताच्या विरोधात उभे करण्याचे षड्यंत्र ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत.

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच गोहत्या संपूर्णपणे थांबतील !  – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय, मुंबई

भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात.

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून साधना करावी ! – पू. प्रदीप खेमका, धर्मप्रचारक, सनातन संस्था (झारखंड)

कोरोनाच्या काळात माझा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. माझ्या कोणत्याही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्ये खरोखर शक्ती असल्याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू ! – अजित सिंह बग्गा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडल आणि अध्यक्ष, वाराणसी व्यापार मंडल

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही.

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा गौरव !

श्री अंजनेश्वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला.