श्री क्षेत्र तपोभूमी येथील यज्ञोपवित विधीची ‘एशिया बुक’मध्ये नोंद

कुंइई येथील श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ३० ऑगस्ट या दिवशी श्रावणविधी झाला. या वेळी यज्ञोपवित धारण करण्याच्या कार्यक्रमात ५ सहस्र २०० भाविकांचा सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने या कार्यक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

वास्को सप्ताह फेरीत ‘बायबल’चे विनामूल्य वितरण केंद्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून वितरण केंद्र बंद पाडले !

‘बायबल’चे विनामूल्य वितरण करून भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. याला वेळीच आळा घालणार्‍या बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि इतर यांचे अभिनंदन !

खोट्या बलात्काराच्या प्रकरणांत लोकांना अडकवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या तरुणींच्या कारस्थानात पोलिसांचा सहभाग 

गोव्यातील पोलिसांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागाची एकावर एक प्रकरणे उघड होत आहेत. हे त्वरित रोखणे आवश्यक आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून अराजक माजेल !

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्‍यांवर कारवाई करणार ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, हस्तकला महामंडळ

प्रतिवर्षी अशी चेतावणी दिली जाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळही काही मूर्तीशाळांवर धाड घालून श्री गणेशमूर्ती मातीचीच आहे ना, याची पडताळणी करते; पण मूर्ती विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्यात मूर्ती तरंगतांना दिसतात.

गोव्यातील आमदार आता लेह-लडाखच्या अभ्यास दौर्‍यावर जाणार

आमदार अभ्यास दौर्‍यात काय शिकले ? त्याचा राज्यासाठी काय लाभ झाला ? किंवा होणार, ते जनतेला सांगावे, अन्यथा ‘असे अभ्यास दौरे हा केवळ जनतेच्या पैशातून मौजमजा करण्याचा एक प्रकार आहे’, असे जनतेला वाटल्यास त्यात चुकीचे काय !

आगशी (गोवा) येथे बैलाची अवैध वाहतूक रोखणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण ! 

गोरक्षक किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी लक्षात आणून दिलेल्या घटनांच्या व्यतिरिक्त अशा आणखी कितीतरी घटना घडत असणार !

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी अभ्यास समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. वर्षा कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

मोपा येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको !

आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला.

केपे गणेशोत्सव मंडळाच्या सोडत खरेदीसाठी झुंबड

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे व्यावसायीकरण झाले आहे. लोक स्वलाभासाठी सोडत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.