कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अहवालाला अटींसह तांत्रिक संमती ! – केंद्रशासनाची राज्यसभेत माहिती

केंद्रीय जल आयोगाने कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अहवालाला ‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य स्थिती या आधारांवर संमती दिली आहे; मात्र यासाठी काही निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! – मुख्यमंत्री

पर्यटक जतीन शर्मा यांनी हॉटेलचा कर्मचारी रायस्टन डायस याच्या अनियंत्रित वागण्याविषयी विरुद्ध हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी रायस्टनने त्याच्या साथीदारासह जतीन शर्मा यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.

गोवा : हणजूण येथे पर्यटक कुटुंबावर प्राणघातक आक्रमण

‘‘हणजूण येथे एका रिसॉर्टमध्ये गुंडांनी आमच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुंडांच्या विरोधात सौम्य गुन्हा नोंदवला. स्थानिक गुंडांना साहाय्य करण्यासाठी हे करण्यात आले. हणजूण येथील ‘स्पॅझिओ लेझर रिसॉर्ट’ला भेट देऊ नका – जतीन शर्मा

गोव्यात शिवोली येथे दुभत्या गायीची हत्या : दुष्कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त

एका ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरणात दोन्ही संशयित शेतातून एका पिशवीत काहीतरी घेऊन जातांना दिसत होते. यावरून संशय बळावला. संशयितांनी गोहत्या केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.

गोव्यात ३९ दिवसांमध्ये आगीच्या १ सहस्र ३०० दुर्घटना : ८व्या दिवशीही आगीच्या दुर्घटना चालूच !

आग अजूनही सक्रीय आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल, वन खाते, भारतीय वायू सेना, नौसेना आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

गोवा : उष्णतेच्या लाटेसंदर्भात शासनाकडून सूचना !

राज्यातील तापमानात वाढ होत असल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांसाठी अशा प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत . . . काय करावे ? √√√ आणि काय करू नये ? ×××

गोवा : भगवान महावीर अभयारण्यातही पोचली आग !

म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशू-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांची म्हादई अभयारण्यातील आग दुर्घटनांवर देखरेख ! – विश्वजीत राणे, वनमंत्री

गोव्यातील वनक्षेत्राला लागलेली आग विझवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळवले आहे. केंद्र सरकार देत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती गोमंतकीय कृतज्ञ आहेत.

गोवा : पैशांच्या लोभापायी पेडणे येथे देवस्थानच्या भूमीही विकण्याचा घाट

गावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून आहे. अलीकडील काही मासांमध्ये देवस्थानच्या भूमी विकण्याचा घाट घातला जात आहे.

हज समितीच्या अध्यक्षांना मंत्रीपदाचा दर्जा देणार नाही ! – सरकारचे स्पष्टीकरण

सरकारच्या निर्णयावर राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ यांनी तीव्र आक्षेप नोंदवून सरकारने निर्णयाविषयी फेरविचार करण्याची मागणी केली होती.