पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट !

तालयोगी ‘पद्मश्री’ पं. सुरेश तळवलकर, गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर, गांधर्व महाविद्यालयाचे निबंधक श्री. विश्‍वास जाधव आणि तबलावादक पं. अमोद दंडगे यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली.

मोन्सेरात यांच्या मोर्च्यात ८०० जणांचा सहभाग, तर ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाल्याची पोलीस अधिकार्‍याची न्यायालयात साक्ष

गंभीर घटनेची आणि तीही पोलिसांच्या संदर्भातील घटनेवरील सुनावणी १५ वर्षांनंतर होणे लज्जास्पद ! पोलिसांना १५ वर्षे न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाचे काय ?

भारतातील आरोग्य सुविधा उत्कृष्ट ! –  जी-२० च्या प्रतिनिधी डॉ. कॅरीन कॅलींडर

भारत देशात कर्मचारी महिला, शिशु आणि मुलांचे आरोग्य अन् त्यांची निकोप वाढ यांसाठी देत असलेले महत्त्व, घेत असलेली काळजी पाहून मी प्रभावित झाले. सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढवण्यासंदर्भात भारताकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.

ब्रेक्झिटनंतर पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारणार्‍या गोमंतकियांमध्ये घट

गोव्यातील नागरिक विशेषतः ख्रिस्ती पोर्तुगीज पारपत्राद्वारे पोर्तुगालमध्ये जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारत असत आणि त्यानंतर पोर्तुगाल आणि इंग्लंड दोन्ही युरोपियन महासंघात असल्याने त्यांना इंग्लंडमध्ये पारपत्राविना जाऊन रहाणे शक्य होत असे.

गोवा : खाणींच्या ‘ई-लिलाव’च्या दुसर्‍या फेरीला प्रारंभ

यापूर्वी खाणींच्या ‘ई-लिलाव’च्या पहिल्या फेरीत डिचोली खाण वेदांता, शिरगाव येथील खाण साळगावकर, मोंत दी शिरगाव येथील खाण नाना बांदेकर आणि काले येथील खाण फॉमेंतो यांनी मिळाली होती.

‘गोवा डेअरी’चे १२ पैकी ७ संचालक अपात्र : प्रशासकीय समिती नियुक्त

सहकार निबंधकांनी ‘गोवा डेअरी’च्या ६ कोटी रुपयांच्या कथित पशूखाद्य घोटाळ्याची स्वेच्छा नोंद घेऊन ‘गोवा डेअरी’च्या विद्यमान आणि माजी मिळून एकूण १८ संचालकांच्या विरोधात सुनावणी प्रकरणी सहकार निबंधकांनी हा आदेश दिला आहे.

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘दक्षिण काशी डेव्हलॉपमेंट सर्किट’ योजना ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच गोव्यात योग आणि ‘वेलनेस’ सेंटर यांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांना दिली.

पोलिसांची कृती राजकीय दबावाखाली ! – हनुमंत परब यांचा आरोप

भाजपच्या राज्यात गोरक्षक किंवा पर्यावरण रक्षक यांचा गुन्हेगारांच्या सूचीत समावेश अपेक्षित नाही !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याच्या नोटिशीवरून गावात तणावाचे वातावरण

नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची एक प्रत सामाजिक माध्यमातून फिरू लागली. मंदिर पाडले जाऊ नये, यासाठी भक्तगण, तसेच राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत.

गोव्यातील वन क्षेत्राला लागलेल्या आगींमुळे पावसात पूर येण्याची शक्यता ! – तज्ञांचे मत

पावसाळ्यात वनांमधून जळलेल्या झाडांचे अवशेष आणि राख नद्यांमध्ये वाहून येणार ! नद्यांमध्ये अगोदरच गाळ साचलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथून मातीचा भराव नद्यांमध्ये आल्यास समस्येत वाढ होणार आहे !