गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘दक्षिण काशी डेव्हलॉपमेंट सर्किट’ योजना ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

फोंडा तालुका, नार्वे येथील ऐतिहासिक श्री सप्तकोटीश्वर मंदिर आणि तांबुडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर यांचा योजनेत समावेश

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

फोंडा, २० एप्रिल (वार्ता.) – गोवा सरकार राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘दक्षिण काशी डेव्हलॉपमेंट सर्किट’ योजना कार्यान्वित करणार आहे. फोंडा तालुक्यात पुरातन अशी अनेक मंदिरे आहेत. यासाठी फोंडा तालुका, नार्वे येथील ऐतिहासिकश्री सप्तकोटीश्वर मंदिर आणि तांबुडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर यांचा ‘दक्षिण काशी डेव्हलॉपमेंट सर्किट’ योजनेत समावेश करून या क्षेत्राचा विकास केला जाणार आहे.

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच गोव्यात योग आणि ‘वेलनेस’ सेंटर यांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांना दिली.