‘फ्रूट शेक’ पिणे चुकीचे

दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.

सततच्या पंख्याच्या वार्‍याने होऊ शकणारे त्रास

रात्री झोपेत ६ ते ८ घंटे पंख्याचे जोराचे वारे अंगावर येत असतात. या सततच्या मोठ्या वार्‍यामुळे शरिरात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे अनेकांना खोकला चालू होतो. सकाळी उठल्यावर काहींचे अंग आखडते. काहींना सकाळी उठल्यावर थकवा येतो.

मन प्रसन्न करणारे वाळ्याचे सुगंधी पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागेल तेव्हा वाळ्याचे सुगंधी पाणी प्यावे. यामुळे मन प्रसन्न रहाण्यास, तसेच उष्णतेमुळे होणारे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे

‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’

कोलेस्ट्रॉल !

सध्या वाढते कोलेस्ट्रॉल ही फार मोठी समस्या झाली आहे. फार अल्पवयात आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढल्याची उदाहरणे बघायला मिळतात. सर्वप्रथम ‘कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ?’ ते आपण जाणून घेऊया.

डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’

दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी करावयाच्या कृती या लेखात पाहूया.

कंटकारी (रानवांगे)

‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.

सर्दीमुळे कानांत दडे बसल्यास ते दूर होण्यासाठीचा सोपा उपाय

सर्दीमुळे किंवा थंड वारा लागल्याने रुग्णाच्या कानांत दडे बसून ते दुखू लागल्यास, लालबुंद निखार्‍यांवर हळद घालून त्यातून येणारा गरम धूर कानांत जाईल, अशी व्यवस्था करावी.

सायंकाळचे जेवण सूर्यास्तापूर्वी अथवा त्यानंतर लवकरात लवकर का करावे ?

‘सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण केल्याने अन्न पचनासाठी सूर्याकडून ऊर्जा मिळते. अन्न पचन होण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. सायंकाळी घेतलेल्या आहाराचे दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत पूर्णतः पचन होते. परिणामी मल प्रवर्तन योग्य वेळी होण्यासाठी साहाय्यक ठरते.