खालीलपैकी प्रत्येक आजारामध्ये वैद्यकीय समादेशाने ५० ते २५० मिलीग्रॅम शंखभस्म घेऊ शकता.
१. मूकपणा
मुक्या व्यक्तीने प्रतिदिन २-३ घंटे शंख वाजवावा. त्याला मोठ्या शंखामध्ये २४ घंटे ठेवलेले पाणी पिण्यास द्या, लहान शंखांची माळा बनवा आणि गळ्यात घालायला द्या, तसेच ५० ते २५० मिलीग्रॅम शंखभस्म सकाळ-सायंकाळ मधासह चाटण्यास द्या. त्यामुळे मूकपणा न्यून होण्यास साहाय्य होते.
२. पचनशक्ती आणि भूक वाढवण्यासाठी
मिरी आणि शंखभस्म यांचे १ ग्रॅम चूर्ण सकाळ-संध्याकाळ जेवणापूर्वी मधासमवेत घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि भूक वाढते. (असे चूर्ण घेण्यापूर्वी वैद्यांचा समादेश घ्यावा. – संपादक)
३. पोटदुखी आणि अपचन
लिंबाच्या रसात साखर आणि शंखभस्म मिसळून सेवन केल्याने अपचन दूर होते. जेवणानंतर कोमट पाण्यासह शंखभस्म घेतल्याने पोटदुखी दूर होते.
४. आमातीसार
१.५ ग्रॅम जायफळ चूर्ण, १ ग्रॅम तूप आणि शंखभस्म एकत्र करून एक घंट्याच्या अंतराने दिल्यास रुग्णाला आराम मिळतो.
५. प्लिहा (रक्ताभिसरणाशी संबंधित अवयव) वाढणे
चांगले पिकलेल्या लिंबाच्या १० मिलीग्रॅम रसामध्ये शंखभस्म घालून घेतल्याने वाढलेल्या प्लिहेचा आकार न्यून होण्यास साहाय्य होते. वैद्यांच्या सल्ल्याने हे चूर्ण घ्यावे. असा रस प्यायल्याने कासवासारखी वाढलेली प्लिहाही पूर्ववत् होऊ लागते.
(साभार : ‘भारतीय धरोहर’चे संकेतस्थळ)