दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय

सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात

व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप आहारविहार !

आजच्या लेखामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार कसा असावा ? हे येथे देत आहोत. ‘कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार करायचा याविषयी लेखात माहिती दिली आहे.

रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’

दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.

वाढणार्‍या उष्‍णतेमध्‍ये थेट थंड लादी वा कडप्‍पा यांवर झोपणे योग्‍य कि अयोग्‍य ?

आसन न घेता थेट लादी किंवा कडप्‍प्‍यावर बसल्‍याने किंवा झोपल्‍याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्‍यादींमध्‍ये वेदना होतात.

दिवसातून २ वेळाच आहार घेऊन कृशता येत असेल, तर आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा

आहार न्‍यून पडल्‍याने काहींचे वजन अजून न्‍यून होऊ लागते आणि कृशता येते. असे होऊ लागल्‍यास आवश्‍यकतेनुसार तिसरा आहार घ्‍यावा.

स्‍वतःची प्रकृती (वात, पित्त आणि कफ) कशी ओळखावी ?

आपण म्‍हणत असतो की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वतःचे खास असे वेगळेपण असते. प्रत्‍येक व्‍यक्‍ती ही इतरांसारखी नसते. प्रत्‍येकाच्‍या आवडी वेगवेगळ्‍या असतात.

प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.

शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.

सततच्‍या सर्दीवर सोपा उपाय

सततच्‍या सर्दीचे एक कारण आणि त्यावरील उपाय

शरिरातील धातूंचे महत्त्व आणि कार्य !

आपण जेवढ्या चांगल्‍या दुधाचे विरजण लावू, तेवढे चांगले तूप आपल्‍याला मिळते. त्‍याप्रमाणे आपला आहार चांगला असल्‍यास आपले धातूही उत्तम निर्माण होतील.