
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाचे नेते आणि खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशातील सध्याच्या गंभीर परिस्थितीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. ब्रिटीश संसदेत बोलतांना त्यांनी बांगलादेशात रस्त्यावर हिंदूंच्या हत्या होत असल्याचे, त्यांची घरे आणि मंदिरे यांना आग लावली जात असल्याचे, तसेच इतर धार्मिक अल्पसंख्यांकांनाही अशाच प्रकारच्या हिंसेला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
Today, I raised my concerns on Bangladesh.
With elections looming, the Awami League are still banned.
I am also horrified to see that Hindu's are murdered and their temples burned.
I called on the Govt to act to protect minorities and ensure free and fair elections. pic.twitter.com/DTTCCgcN2S
— Bob Blackman (@BobBlackman) January 15, 2026
१२ फेब्रुवारीला होणार्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह
ब्लॅकमन यांनी इशारा दिला की, बांगलादेशात १२ फेब्रुवारी या दिवशी होणार्या सार्वत्रिक निवडणुका लोकशाहीविषयक गंभीर शंकांच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. प्रमुख राजकीय पक्ष अवामी लीगला निवडणुकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर जनमत चाचण्यांमध्ये या पक्षाला सुमारे ३० टक्के मते मिळत असल्याचे दिसते. याचबरोबर इस्लामी कट्टरपंथींनी जनमतसंग्रहाची मागणी केली असून त्यातून बांगलादेशच्या राज्यघटनेत कायमस्वरूपी पालट होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
📢 Bangladesh Hindu Murders raised in UK Parliament
🇬🇧 MP @BobBlackman confronts the UK govt over the targeted killing of Hindus in Bangladesh. 🇧🇩🚩
🔹 Serious concerns raised over the upcoming Feb 12 elections.
🔹 Demand for a firm international stance.A stinging question:… pic.twitter.com/PaXQ2Aabxy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 16, 2026
ब्रिटन सरकारकडून ठोस भूमिकेची मागणी
पुढील आठवड्यात ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी संसदेत निवेदन द्यावे आणि ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी ब्रिटन सरकार कोणती पावले उचलणार आहे ?’ तसेच ‘दक्षिण आशियाई देशात निष्पक्ष स्वतंत्र आणि सर्वसमावेशक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी काय उपाय केले जाणार आहेत ?’, हे स्पष्ट करावे अशी मागणी ब्लॅकमन यांनी केली.
सर्वपक्षीय खासदारांचे संयुक्त मत
संयुक्त निवेदनात विविध पक्षांतील ब्रिटीश खासदारांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारवर टीका केली. या निवेदनात बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन, जस अटवाल आणि क्रिस लॉ यांचा समावेश होता. त्यांनी बांगलादेशी मतदारांवर अशा प्रकारच्या निर्बंधांची कार्यवाही होऊ नये, असे स्पष्ट केले आणि ‘मोठ्या राजकीय पक्षांना वगळून घेतलेली कोणतीही निवडणूक लोकशाही म्हणता येणार नाही’, अशी चेतावणीही दिली.
संपादकीय भूमिकाभारताच्या संसदेत किती खासदारांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केला ? |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !