(म्हणे) ‘काश्मीरला स्वातंत्र्य भीक मागून नाही, तर हिंदूंचे गळे कापून मिळेल !’ – Abu Musa Kashmiri

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अबू मूसा काश्मिरी याचे चिथावणीखोर विधान

आतंकवादी अबू मूसा काश्मिरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केवळ आतंकवाद आणि जिहाद यांद्वारेच होऊ शकते. स्वातंत्र्य भीक मागून नाही, तर हिंदूंचे गळे कापून मिळेल. आपल्याला जिहादचा झेंडा उचलावा लागेल, असे चिथावणीखोर विधान लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी अबू मूसा काश्मिरी याने विधान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये मुसलमानांना केले. याचा व्हिडिओही समोर आला आहे; मात्र तो कधीचा आहे ?, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अबू मूसा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘जम्मू-काश्मीर युनायटेड मूव्हमेंट’ या संघटनेचा सदस्य आहे. त्याचे नाव एप्रिल २०२५ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाशीही जोडले गेले होते.

पाकिस्तानी नेते जिहादसाठी कटीबद्ध नाहीत !  

अबू मुसा याने व्हिडिओमध्ये पाकिस्तानी नेत्यांवर आरोप करतांना म्हटले की, पाकिस्तानचे नेते इस्लामी तत्त्वांपासून भरकटले आहेत. ते जिहादच्या मार्गावर चालत नाहीत. जो नेता जिहादसाठी कटीबद्ध नाही, त्याला पाकिस्तानवर राज्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत असेच विधान केले होते, असेही त्याने सांगितले.

पहलगाम आक्रमणापूर्वीही केले होते हिंदूंना मारण्याचे विधान

पहलगाम आक्रमणाच्या ४ दिवसांपूर्वी, म्हणजे १८ एप्रिलला लष्कर-ए-तोयबाच्या एका कार्यक्रमात अबू मूसाने काश्मीरमध्ये हिंदूंना मारण्याचा उल्लेख केला होता. त्याचा व्हिडिओही समोर आला होता. यात मूसा म्हणाला होता की, गाझा आणि काश्मीर यांचा एकच प्रश्न असून दोन्ही प्रश्नांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे जिहाद. आम्हाला भीक नाही, स्वातंत्र्य पाहिजे. पॅलेस्टाईन आणि काश्मीर यांचे जे शत्रू आहेत, ते आमचे शत्रू आहेत. जेव्हा इस्रायलला गुडघे टेकायला लावले, तेव्हा काश्मीरमध्येही तेच करू.’

पाकिस्तानात जन्माला येणारे प्रत्येक मूल मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली ! – आतंकवादी महंमद राणा

लष्कर-ए-तोयबाचा आणखी एक आतंकवादी महंमद अशफाक राणा यानेही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यावर टीका केली. त्याने म्हटले होते की, जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या पैशांचा योग्य वापर केला असता, तर पाकिस्तान आज सौदी अरेबियापेक्षाही अधिक सुंदर आणि ब्रिटन अन् स्पेन या देशांपेक्षा अधिक विकसित झाला असता. देशाची परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. पाकिस्तानात जन्माला येणारे प्रत्येक मूल मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली जन्माला येत आहे. जर हे पैसे देशातच गुंतवले असते, तर पाकिस्तान आज अनेक विकसित देशांपेक्षा पुढे असता. (पाकच्या या स्थितीला हिंदुद्वेष आणि जिहादी आतंकवाद कारणीभूत आहेत, हे पाकला अद्यापही लक्षात येत नसल्याने त्याचा विनाश अटळ आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाकमधील जिहादी आतंकवादी हिंदूंचे गळ चिरण्याची भाषा करतात यावरून आतंकवादाला धर्म असतो, हे पुन्हा सिद्ध होते. अशा आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून ठार मारण्यासाठी भारताने सतत प्रयत्नशील असले पाहिजे. अमेरिका आणि इस्रायल यांचा आदर्श भारताने घेतला पाहिजे !