
नवी देहली : सर्वाेच्च न्यायालयाने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातून आणि सार्वजनिक ठिकाणांवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. ही याचिका निवृत्त सनदी अधिकारी बी. बालमुरुगन् यांनी प्रविष्ट केली होती. ‘न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय केल्याबद्दल मोठा दंडही केला जाऊ शकतो’, अशी चेतावणी न्यायालयाने बालमुरुगन् यांना या वेळी दिली. या याचिकेत ‘गंभीर गुन्हे किंवा राष्ट्रविरोधी कारवायांचे आरोप असलेल्या व्यक्तींची जोपर्यंत निर्दोष सुटका होत नाही, तोपर्यंत सरकारने त्यांचा सन्मान करू नये’, अशी मागणीही करण्यात आली होती.
Supreme Court of India rejects the plea to remove Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar’s oil painting from Parliament.
Erasing patriots won’t erase history.
Those who file such petitions should be sentenced to Kaala Paani (Cellular Jail) pic.twitter.com/I2YwZd0DTC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2026
१. ‘आर्थिक अडचणींमुळे युक्तीवादासाठी देहलीला येऊ शकत नाही’, असे बालमुरुगन् यांनी म्हटले होते. यावरून न्यायालयाने त्यांना फटकारत म्हटले की, तुम्ही एक सनदी अधिकारी होता, तुम्ही देहलीला येऊन स्वतःची बाजू मांडू शकता. आम्ही तुम्हाला मोठा दंड ठोठावू शकतो. तुम्ही स्वतःला काय समजता ?
२. न्यायालयाने बालमुरुगन् यांना म्हटले, ‘कृपया अशा वादात पडू नका. निवृत्तीचा आनंद घ्या. समाजात रचनात्मक भूमिका पार पाडा.’ यानंतर बालमुरुगन् यांनी याचिका मागे घेतली.
संपादकीय भूमिकाअशी याचिका करणार्यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा करायला हवी ! |
वीर सावरकर उवाच
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ