शहरी नक्षलवादाच्या विरोधात आता हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथील उरवडे, तळेगाव दाभाडे आणि पेठ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन !

उरवडे येथील सभेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले

पुणे, १२ जानेवारी (वार्ता.) – शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून हिंदूंची दिशाभूल करण्यात येत आहे. यासाठी सर्व हिंदूंनी आता एकजूट होऊन याला विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. उरवडे (तालुका मुळशी, जिल्हा पुणे) येथे ११ जानेवारी या दिवशी नवखंडेनाथ मंदिरातील प्रांगणात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांची उपस्थिती होती. याचप्रमाणे पुण्यातील तळेगाव दाभाडे (तालुका मावळ) आणि पेठ (तालुका हवेली) येथेही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. पेठ येथील सभेत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे संयोजक श्री. सचिन घुले आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. चोरघे महाराज, पेठ गावाचे पोलीस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी, पेठ गावातील ह.भ.प. रघुनाथ किसन चौधरी, ‘चिंतामणी प्रासादिक दिंडी’चे उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी, पेठगावच्या माजी सरपंच सौ. शोभाताई चौधरी, थेऊर गावाचे ह.भ.प. ज्ञानोबा कुंजीर यांची उपस्थिती लाभली. तिन्ही सभांच्या आयोजनात धर्मप्रेमींनी सक्रीय सहभाग नोंदवला. सभेचे नियोजन आणि सूत्रसंचालन पूर्णपणे धर्मप्रेमींच्या माध्यमातूनच पार पडले.

मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्ड यांच्या कचाट्यातून भारतातील मंदिरे अन् त्यांच्या भूमी मुक्त केल्याविना हिंदु जनजागृती समिती स्वस्थ बसणार नाही, असे परखड प्रतिपादन पेठ, ता. हवेली येथील सभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी केले. या वेळी गावातील ह.भ.प. तुषार आबा चौधरी यांनी दीपप्रज्वलन केले. ‘रामजन्मभूमीनंतर आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्षरत रहाणे आवश्यक आहे’, असे मत तळेगाव दाभाडे येथील सभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. तीनही ठिकाणी धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उपस्थित धर्माभिमानी

वैशिष्ट्यपूर्ण

उरवडे, तालुका मुळशी

१. उरवडे गावातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अंकुश गुंड, श्री. नितीन रायरीकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

२. ज्या वाड्यांमध्ये, गावांमध्ये बैठका झाल्या, त्या प्रत्येक भागातील काही जण सभेला आले होते.

३. सभेच्या पटांगणात पुष्कळ धूळ उडत असल्याने धर्मप्रेमींनी टँकर बोलावून स्वतः सर्व परिसर पाण्याने धुतला.

४. श्री. नितीन रायरीकर आणि श्री अंकुश गुंड या दोघांनीही सभेच्या सेवेत सहभागी झालेल्या साधकांच्या रात्रीच्या महाप्रसादाचे नियोजन स्वतः हून ठरवले.

५. हिंदु जनजागृती समितीच्या ‘भुकुम शाखेतील’, श्री. दिनेश माझिरे, शाखा विस्तारक श्री. संतोष भरणे, शाखा सोशल मीडिया सेवक श्री. प्रसाद भांड, शाखा सह-सेवक श्री. नवनाथ साठे, श्री. मोहन सातपुते यांनी पुढाकार घेऊन सभेचा प्रसार केला, तसेच आयोजनात सहभाग घेतला.

६. या वेळी दीप प्रज्वलन पोलीस पाटील सौ. निशिगंधा गुरव, उरवडे गाव, सौ संगीता मारणे, माजी सरपंच श्री तान्हाजी मारणे, सरपंच श्री. तुषार खरात, उरवडे गाव, हिंदु जनजागृती समितीचे पुणे संघटक श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या कुमारी क्रांती पेटकर यांनी केले.उरवडे गावचे सरपंच श्री तुषार खरात व उरवडे ग्रामपंचायत तसेच माजी सरपंच श्री सुरेश काळभोर यांनी व्यासपीठ आणि बैठकीची व्यवस्था उपलब्ध करून दिली. श्री. दिलीप बलकवडे व श्री. शुभम गुंड यांनी साउंड सिस्टीम आणि लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिली. श्री. अमित वाल्हेकर यांनी टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था करून दिली.

पेठ येथील सभेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे

पेठ, तालुका हवेली (पुणे)

१. पेठ गावातील श्री. ललित चौधरी, श्री. गणेश गावडे यांनी व्यासपीठ आणि प्रदर्शन सजावट, तसेच सोरतापवाडी गावातील श्री. प्रज्वल चौधरी फ्लेक्स सजावट यांसाठी मोलाचे सहकार्य केले.

२. हिंदु जनजागृती समितीच्या ‘हडपसर शाखेतील’ श्री. अथर्व खडसरे, श्री. देव बुर्‍हाडे, श्री. शुभम डोणवाडे, श्री. उत्कर्ष मुळे, तसेच सोरतापवाडी शाखेतील श्री. बसवराज बिराजदार,श्री. उत्तम गुंजाळ महाराज, श्री. शुभम चोरघे, श्री. दत्ता चौधरी, श्री. किसन मेमाणे यांनी पुढाकार घेऊन सभेचा प्रसार केला, तसेच आयोजनात सहभाग घेतला.

३. पेठ गावातील कृतीशील धर्मप्रेमी कु. तन्मय चौधरी यांनी नियमित प्रसाराला वेळ दिला आणि सभेच्या दिवशी आयोजनात पुष्कळ तळमळीने साहित्य ने-आण सेवा केल्या.

४. पेठ गावचे पोलिस पाटील श्री. दत्तात्रय चौधरी यांनी सभेसाठी अनुमती मिळवणे तसेच कार्यकर्त्यांसोबत नियमित प्रसार करणे, इत्यादी सेवा तळमळीने केल्या.५. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे आणि सौ. सुवर्णा चोरघे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी मोलाचे साहाय्य केले.

उपस्थित धर्माभिमानी
दीपप्रज्वलन करतांना (डावीकडे) श्री. दीपक आगवणे आणि ह.भ.प. तुषार आबा चौधरी

तळेगाव दाभाडे

१. तळेगाव दाभाडे येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निवृत्ती चेअर, श्री. राहुल चौघुले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

२. या व्याख्यानाला ‘वडगाव न्यायालय बार चेंबर’चे अधिवक्ता श्री. अमोल दाभाडे हे उपस्थित होते.

३. ‘रेनो सोसायटी’च्या जीवनविहार मधील सदस्यांनी पुढाकार घेऊन सभेचा प्रसार केला.

४. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

५. या सभेला वडगाव न्यायालय बार चेंबरचे अधिवक्ता श्री.अमोल दाभाडे हे उपस्थित होते.