
मागील काही दिवसांपासून इस्लामी प्रजासत्ताक असलेल्या इराणमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. रस्त्यावर येऊन नागरिकांनी सरकारची कार्यालये कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. इराणमधील खामेनी सत्ताधार्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले असून सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने चालू आहेत. परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली असून आंदोलनाला हिंसक स्वरूप आले आहे. हिंसाचाराचा भडका इराणच्या विविध शहरांमध्ये वेगाने पसरत असून आतापर्यंत ११० हून अधिक शहरे हिंसेने बाधित झाली आहेत. अश्रुधूर, लाठीमार केला, तरी आंदोलक थांबायला सिद्ध नाहीत. त्यामुळे पोलिसांनी २ सहस्र २०० हून अधिक नागरिकांना कह्यात घेतले आहे; मात्र त्यानंतरही आंदोलन निवळण्याऐवजी हिंसाचार अधिकच तीव्र होत आहे. इराणचे सर्वाेच्च नेते आयातुल्ला अली खामेनी देश सोडून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याची वृत्तेही सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होत आहेत; मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परिस्थिती अशीच राहिली, तर काही काळापूर्वी बांगलादेशामध्ये जी राजकीय स्थिती निर्माण झाली, तीच इराणमध्येही होण्याची संभावना आहे.
पारसी (पर्शियन) राष्ट्र असलेल्या इराणमध्ये महंमद पैंगबर यांच्या मृत्यूनंतर अरबांची टोळधाड पडली आणि त्यानंतर इराणमधील पारशी संस्कृती नष्ट व्हायला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमणानंतरचा जो भारताचा इतिहास आहे, त्यापेक्षा इराणचा इतिहास वेगळा नाही. त्या वेळी ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही, त्यांना ते पारशी म्हणून रहाण्यासाठी जिझिया कर द्यावा लागत होता. पारसी धर्माची ‘आग्यारी’ ही धार्मिक स्थळे इस्लामी कट्टरतावाद्यांनी नष्ट केली आणि स्वत:च्या देशात पारशी लोकांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. अनेक पारशी लोक स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी भारतात आले आणि कायमचेच स्थायिक झाले. भारताचा धर्म आणि संस्कृती अबाधित राहिली; परंतु ७ व्या शतकानंतर आता २१ व्या शतकात इराण एक कट्टरतावादी इस्लामी राष्ट्र होत गेले. राष्ट्राची व्यवस्था उलथवून टाकण्याच्या दिशेने नागरिकांनी क्रांती करणे, हा मुळात एखाद्या तत्कालीन परिस्थितीचा परिणाम असूच शकत नाही. सत्ताधार्यांना उलथवून टाकण्याच्या इर्षेने रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती हा व्यवस्थेच्या विरोधातील दीर्घकालीन असंतोषाचा परिणाम आहे. हे मुळात लक्षात घ्यायला हवे. वरवर महागाई किंवा भ्रष्टाचार यांमुळे नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचे दिसत असले, तरी इराणमधील वाढत्या इस्लामी परिणामांचा हा भडका आहे.

इस्लामी कट्टरतावादाची फळे !

इराणमध्ये ७ व्या शतकात इस्लामची राजवट आली असली, तरी सध्या शासक असलेल्या अली खामेनी यांच्या काळात इराणमधील इस्लामी कट्टरतेचा कडेलोट झाला. त्यापूर्वी वर्ष १९७९ मध्ये इराणमध्ये आयतोल्ला खोमेनी हे शासक होते. त्यांनी इराणमधील कट्टरतावादाला बळकट केले. खामेनी यांच्या पूर्वीचा शासक महंमद रझा शाह पहलवी याने अमेरिकेत पलायन केले. सध्या ते अमेरिकेचे आश्रित आहेत. सद्यःस्थितीत इराणमध्ये रस्त्यावर उतरलेले आंदोलक ‘पहलवी’ यांची सत्ता पुन्हा इराणमध्ये आणण्याच्या आणि खामेनी यांची सत्ता उलथवून लावण्याच्या घोषणा देत आहेत. यावरून आंदोलकांचा रोख हा केवळ महागाई किंवा भ्रष्टाचार नाही, तर इस्लामी कट्टरतावाद हाच आहे. इराणमधील खामेनी यांच्या सत्ताकाळातील काही घटनांचा आढावा घेतला, तर त्यांचा इस्लामी रक्तपिसासूपणा उघड होईल. केवळ जगाच्या भीतीमुळे त्यांच्या तलवारी अन्य धर्मियांचे गळे चिरायच्या थांबल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय मुलीने हिजाब व्यवस्थित घातला नाही; म्हणून तिला पोलिसांनी अटक केली आणि पोलीस कोठडीमध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर सहस्रावधी मुसलमान महिला इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. या महिलांनी सामूहिकरित्या हिजाबची भर चौकात होळी केली. रस्त्यावरून चालणार्या इस्लामी धर्मगुरूंच्या टोप्या मागून येऊन उडवून टाकण्याचे इराणमधील प्रकार सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. हा प्रकार केवळ टोप्या उडवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर इस्लामी कट्टरतावाद उलथवून लावण्याचे हे द्योतक होते. सध्या रझा पहलवी यांना परत आणण्याच्या घोषणा इराणमध्ये आंदोलक देत आहेत. त्यांनी त्यांच्या सत्ताकाळात म्हणजे वर्ष १९७९ पूर्वी इराणमध्ये इस्लामच्या धार्मिक कट्टरतावादाला फाटा दिला. स्वत: मुसलमान असूनही त्यांनी इराणी नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. सध्या इराणमधील लोक धर्मांध इस्लामी कट्टरतावादी खामेनी यांचा नव्हे, तर पहलवी यांचा पुरस्कार करत आहेत. ही गोष्ट जगाने लक्षात घ्यायला हवी.
वेळीच जागे व्हा !

इस्लामी कट्टरतावादाचा फटका जसा इराणला बसला आहे, तसा फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, अमेरिका आदी सर्व राष्ट्रांना बसला आहे. भारतातही परिस्थिती वेगळी नाही. एरव्ही भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांच्या नावाने गळा काढणारे इस्लामच्या या कट्टरतावादाविषयी मूग गिळून गप्प आहेत. इराणमधील मुसलमान हिजाबच्या विरोधात रस्त्यावर उतरत असले, तरी भारतातील मुसलमान हिजाबच्या विरोधात नव्हे, तर हिजाबसाठी रस्त्यावर येत आहेत. भारतातील मुसलमान बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी गप्प आहेत; मात्र भारतात घुसखोरी करणार्या बांगलादेशी धर्मबांधवांना सहकार्य करत आहेत. ही लक्षणे भारताच्या लोकशाहीला प्राधान्य देणारी नाहीत; मात्र इस्लामच्या कट्टरवादाकडे झुकणारी निश्चितच आहेत.
‘इराणमधील आंदोलकांवर अत्याचार केले, तर आक्रमण करू’, असे सांगणारी अमेरिकेची भूमिका ही इराणवर सत्ता प्रस्थापित करणारी आहे; परंतु भारतासाठी हा प्रश्न धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यायाने राष्ट्रीयत्वाशी संबंधित आहे. वर्ष २०१२ मध्ये म्यानमार येथे रोहिंग्यांवर अत्याचार झाल्याच्या कथित घटनेवरून भारतात मुंबईतील आझाद मैदानात मुसलमानांनी हिंसाचार केला होता; मात्र इराणमध्ये मुसलमान इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात रस्त्यावर येऊनही भारतातील मुसलमान त्यांना साथ द्यायला पुढे आलेले नाहीत. भारताची स्थिती इराणमधील कट्टरतावादासारखी भयावह वाटत नसली, तरी कट्टरतावादाच्या मनोवृत्तीची माणसे येथे दबा धरून बसली आहेत, हे वरील मानसिकतेवरून लक्षात येते. भविष्यातील हा धोका हिंदूंनी वेळीच लक्षात घ्यायला हवा !
| इराणमधील आंदोलकांचा रोख केवळ महागाई किंवा भ्रष्टाचार हा नाही, तर इस्लामी कट्टरतावाद हाच आहे ! |
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !