बलुचिस्तानच्या नेत्याने परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना खुले पत्र लिहून व्यक्त केली चिंता

नवी देहली – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील निर्वासित बलुची नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे.
🚨 China in Balochistan = New Threat to India?
Baloch leader Mir Yar Baloch (@miryar_baloch) warns that if China deploys troops in Pakistan’s Balochistan, it will pose a direct challenge to India 🇮🇳
In an open letter to S. Jaishankar, he flagged the dangerous China-Pakistan… pic.twitter.com/763UFv6MFC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2026
या पत्रात चीन आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेल्या जवळीकीवर चिंता व्यक्त केली आहे. ‘बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्याला योग्य वेळी बळ न मिळाल्यास चीन येथे सैन्य तैनात करू शकतो’, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. बलुचिस्तानमध्ये चिनी सैन्याची उपस्थिती भविष्यात भारत आणि बलुचिस्तान दोघांसाठीही मोठे आव्हान ठरेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्यांवर भर

या पत्रात मीर यार बलोच यांनी भारत आणि बलुचिस्तान यांच्यातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि व्यापारी संबंधांची चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानला मूळासकट उखडून टाकण्याची मागणी केली आणि यासाठी बलुचिस्तानमधील प्रत्येक नागरिक भारताच्या पाठीशी असल्याचे नमूद केले. श्री हिंगलाजमाता मंदिरासारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करून त्यांनी ही आपली सांधलेली परंपरा असल्याचे स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक
मीर यार बलोच यांनी पहलगाम येथील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आणि भारत सरकारच्या ठाम अन् धाडसी भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले की मागील ६९ वर्षांपासून बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानकडून होणार्या दडपशाहीला सामोरे जात आहेत आणि आता या समस्येचे मूळापासून निराकरण करून देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित करणे आवश्यक आहे.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक