रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांचे ठरावाच्या बाजूने मतदान
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने इराणविरुद्धची सैनिकी कारवाई थांबवण्यासाठी मांडलेला ठराव संमत करण्यात आला आहे. ५० विरुद्ध ४८ मतांनी हा ठराव संमत झाला. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन फेटरमन यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे. याच महिन्याच्या प्रारंभी संसदेच्या कनिष्ठ सभागृहानेही या ठरावाला संमती दिली होती. ट्रम्प यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणार्या त्यांच्या पक्षाच्या खासदारांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांना दिखाऊपणा करणारे म्हणत त्यांचे कृत्य देशभक्ती दर्शवणारे नाही, अशी टीका केली आहे.
‘अमेरिकेची संसद अधिकृत संमती देत नाही, तोपर्यंत इराणविरुद्धचे युद्ध थांबवावे’, अशी तरतूद या ठरावात आहे. ट्रम्प यांच्या युद्ध अधिकारांवर मर्यादा आणणारा हा ठराव दहाव्यांदा संमत करण्यात आला आहे. यामुळे ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण आणि युद्ध संबधित निर्णय यांवर कोणते प्रत्यक्ष निर्बंध येणार ?, याविषयी स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !