
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी स्वित्झर्लंडमध्ये पाकिस्तानचे कौतुक केले होते. यामुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे रिक स्कॉट आणि टिम शिही या २ खासदारांनी त्यांच्याविषयी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘वान्स ज्यांचे कौतुक करीत आहेत, ते पाकिस्तान आणि कतार यांनी आतंकवाद्यांना आश्रय दिला आहे. हे दोन्ही देश इराणच्या आतंकवादी मोहिमेला प्रोत्साहन देण्यात अधिक रस दाखवत आहेत’, असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तान बर्याच काळापासून आतंकवाद्यांना देत आहे आश्रय ! – खासदार रिक स्कॉट

फ्लॉरिडाचे खासदार रिक स्कॉट यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘आता प्रत्येकाला हे स्पष्ट झाले पाहिजे की, आपले खरे मित्र कोण आहेत ? पाकिस्तान आणि कतार बर्याच काळापासून आतंकवाद्यांना आश्रय देत आले आहेत. सध्या हे दोन्ही देश शांतता प्रस्थापित करण्याऐवजी इराणच्या अनेक दशके जुन्या आतंकवादी मोहिमेला पाठबळ देण्यात अधिक व्यस्त दिसत आहेत.’
स्कॉट यांनी पुढे म्हटले की, इराणसोबत कोणताही करार होऊ शकतो; परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, इराण कधीही अणूबाँब बनवण्याच्या स्थितीत असता कामा नये.
पाकिस्तान आय.एस्.आय.च्या माध्यमातून अमेरिकेच्या विरोधातील बंडखोरांना पैसे पुरवतो ! – खासदार टिम शिही

मोंटानाचे खासदार टिम शिही यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानवर ओसामा बिन लादेनला १० वर्षे लपवून ठेवल्याचा आरोप केला. शिही म्हणाले की, जर पाकिस्तान आणि कतार चर्चेसाठी एकत्र आले असतील, तर संयुक्त अरब अमिरात, इस्रायल अन् सौदी अरेबिया यांनाही सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांनी या तिन्ही देशांना मध्यपूर्वेतील अमेरिकेचे खरे मित्र आणि सहयोगी मानले. शिही म्हणाले की, कतार अनेक दशकांपासून आतंकवादी संघटनांना अर्थपुरवठा करीत आहे. दुसरीकडे पाकिस्तान आय.एस्.आय.च्या माध्यमातून अमेरिकेच्या विरोधातील बंडखोरांना पैसे पुरवत आहे. अशा स्थितीत त्यांना निष्पक्ष मध्यस्थ मानणे पूर्णपणे चुकीचे ठरेल.
काय म्हणाले होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स ?
वान्स म्हणाले होते, ‘मी पाकिस्तानवर प्रेम करतो.’ तसेच पाकिस्तानी सैन्यदलप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याबद्दल म्हटले होते, ‘मुनीर यांनी इस्लामाबादमध्ये माझे स्वागत केले होते. मी अनेकदा विनोद करतो की, माझ्या आयुष्यात २ अतिशय महत्त्वाचे लोक आहेत- एक भारतीय आणि एक पाकिस्तानी. भारतीय माझी पत्नी आहे आणि पाकिस्तानी फील्ड मार्शल मुनीर आहेत.’ वान्स यांनी असेही सांगितले होते की, गेल्या ३ महिन्यांत त्यांनी मुनीर यांच्याशी इतर कुणापेक्षाही अधिक संवाद साधला आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !