
पॅरिस (फ्रान्स) – युरोपमध्ये उष्णतेची लाट आली असून लाखो नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ब्रिटन आणि स्पेन या देशांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. ब्रिटनमध्ये हवामान विभागाने अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे. जूनमधील दैनंदिन तापमानाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शाळा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच येथील रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. फ्रान्समध्ये तापमान दिवस-रात्र उच्च पातळीवरच रहाणार असल्याची चेतावणी देण्यात आली आहे. तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळवण्याच्या प्रयत्नात असतांना ४० जणांचा ५ दिवसांत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. फ्रान्स आणि ब्रिटन देशांतील अनेक शहरांमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक संस्थेच्या अंदाजानुसार पुढील ५ वर्षांत उष्णतेचे आणखी अनेक विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !