मुलीचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या टांगैल जिल्ह्यातील सखीपूर येथून २ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सेजुती नावाच्या ८ वर्षांच्या निष्पाप हिंदु मुलीची हत्या करण्यात आली आहे. २२ जूनला सकाळी पोलिसांनी तिचा मृतदेह सखीपूर नगरपालिकेच्या तलावातून बाहेर काढला. मृत मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, अपहरणकर्त्यांनी २१ जूनच्या रात्री दूरध्वीनवरून तिच्या सुटकेच्या बदल्यात ३ लाख टका (२ लाख ३१ सहस्र रुपये) खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न मिळाल्यामुळे गुंडांनी मुलीचा जीव घेतला.
🚨 Bangladesh: 8-year-old Hindu girl abducted and brutally murdered in Sakhipur. Her body was later found floating in a pond.
The victim's family alleges the kidnappers demanded a ransom of 3 lakh taka (₹2.31 lakh) before her murder.
Justice must prevail, and the safety of… pic.twitter.com/NpbFRpGQof
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2026
१. २० जून या दिवशी सखीपूरच्या मंदिरपाडा परिसरात रहाणारी आणि इयत्ता २ दुसरीच्या वर्गात शिकणारी सेजुती संध्याकाळी अचानक घराबाहेरून बेपत्ता झाली.
२. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; पण काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर मुलीचे वडील फालू चंद्र मालू यांनी सखीपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
३. २१ जूनला अपहरणाची ही बातमी सामाजिक माध्यमांवर पसरताच संपूर्ण परिसरात तणाव वाढला. त्याच रात्री खंडणीसाठी दूरध्वनी आला. खंडणीचा दूरध्वनी आल्याच्या अवघ्या काही घंट्यांनंतर, २२ जूनला सकाळी मुलीचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला.
४. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचे पुढील अन्वेषण चालू आहे.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले