नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५
|

नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – देशात काही खासगी इस्लामी संघटनांकडून चालवल्या जाणार्या अवैध हलाल प्रमाणपत्रामुळे राष्ट्रात गंभीर संकट उभे राहिले आहे. ही गंभीर गोष्ट आहे. ही प्रणाली व्यावसायिक गोष्ट राहिलेली नसून ती भारताच्या सार्वभौमत्वकेला आव्हान देणारी आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशाच्या धर्तीवर ‘हलाल प्रमाणपत्र’ प्रणालीवर देशव्यापी बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. मोहन मते यांनी ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. ते औचित्याचे सूत्र मांडतांना बोलत होते.
Maharashtra Assembly, BJP MLA Mohan Mate @MohanMateBJP raises two major concerns:
❗ Ban Halal certification nationwide – cites risks to national security
❗ Enact a law to protect Devasthan lands from illegal acquisition.
The nation cannot ignore these warnings! 🇮🇳 pic.twitter.com/fiV56VXeLE— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 9, 2025
देवस्थानांच्या शेतभूमीच्या संरक्षणासाठी बेकायदेशीर भूमी अधिग्रहण विरोधी कायदा करावा !
आमदार श्री. मोहन मते म्हणाले की, मंदिराच्या परिसरातील तलावाच्या स्वच्छतेसाठी आणि उत्सव साजरे करण्यासाठी भक्तांना निधीसाठी हात पसरावे लागत आहेत. त्यांच्या मालकीच्या भूमीवर भूमाफिया मलई खात आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. त्यामुळे धर्माधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांची देशाला आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून देवस्थान आणि मालमत्ता यांचे रक्षण करावे. देवस्थानांच्या सहस्रो एकर शेतभूमी भूमाफियांनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर कठोर ‘बेकायदेशीर भूमी अधिग्रहण विरोधी कायदा’ तात्काळ लागू करून विशेष अन्वेषण पथके स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?↑↑↑ (चित्रावर क्लिक करा) ↑↑↑ इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे . |

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !