पनवेल, रायगड येथील रिक्शा आणि मुंबईतील ‘टॅक्सी’ यांच्या चालकांविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

१. रिक्शाचालकांकडून अवास्तव भाडे आकारले जाणे
पनवेल आणि खांदेश्वर या रेल्वेस्थानकांतून बाहेर आल्यावर इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्शाने जायचे झाल्यास रिक्शाचालक प्रथम ठिकाण विचारून ते त्यांच्या मनाला वाटेल तशी रक्कम मागतात. त्या वेळी त्यांना ‘मीटर’प्रमाणे (शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे) पैसे देते’, असे सांगितल्यावर ते नकार देतात. खरेतर त्यांनी मीटर चालू करून प्रवाशांना त्यांच्या सांगितलेल्या ठिकाणी पोचवणे महत्त्वाचे आहे; परंतु ते मीटरप्रमाणे भाडे न घेता त्यांना अवास्तव भाडे आकारतात. रिक्शा आणि टॅक्सी यांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून मीटर बसवून घेणे अन् त्याप्रमाणे प्रवाशांची ने-आण करणे आवश्यक आहे; परंतु तसे होतांना दिसत नाही.
२. प्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी आणि रेल्वे अधिकारी यांच्याकडून होत असलेले दुर्लक्ष !
पनवेल रेल्वेस्थानकावर येऊन हे रिक्शावाले गिर्हाईक शोधत असतात. मीटरप्रमाणे पैसे न आकारता मनाप्रमाणे पैसे मागण्याचा हा गैरप्रकार गेली अनेक वर्षे चालू आहे; परंतु प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी कधीही तिथे उपलब्ध नसतात. रिक्शा व्यवस्थित उभ्या केलेल्या नसतात. त्यामुळे तिथून येणार्या-जाणार्या प्रवाशांना अडचण येते. मीटरने होणार्या रकमेपेक्षा अधिकचे दर आकारले जातात. त्यांना रोखायला कुणी पोलीस कर्मचारी तिथे उपलब्ध नसतात, तसेच रेल्वेस्थानकातून रिक्शेत बसण्यासाठी प्रवाशांना सामान बाहेर घेऊन जावे लागते. एकदा काही प्रवासी गर्दीतून मार्ग काढून जात असतांना पडले. याविषयी संबंधित रेल्वे अधिकार्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हे आमचे दायित्व नाही, आम्हाला त्रास नको; म्हणून आम्ही तेथे पाईप उभ्या स्थितीत लावून (अडथळा निर्माण होण्यासाठी) घेतले आहेत.’’ परिणामी त्यामुळे रिक्शा आत येऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय होते. याकडे कुणाचेच लक्ष नाही. तरी यामध्ये लक्ष घालून होणारे अपप्रकार लगेच थांबवायला हवेत आणि प्रवाशांना सर्व सुविधा कशा मिळतील ? याची व्यवस्था व्हायला हवी.
३. रिक्शाचालकांना दंड केल्याने काही प्रमाणात समस्या सुटेल !
प्रादेशिक परिवाहन कार्यालय दंड आकारते; परंतु त्याचा काही परिणाम होतो का ? याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. मीटर लावलेल्या; पण मनमानी पद्धतीने पैसे मागणार्या रिक्शाचालकांना त्यांच्या अयोग्य वागण्याविषयी कायद्याप्रमाणे प्रभावी दंड करायला हवा, तरच काही प्रमाणात समस्या सुटतील आणि प्रवाशांची चांगली सोय होईल.
४. मुंबईतील ‘शेअर टॅक्सी’चे मीटर ‘आर्.टी.ओ. पासिंग’ झालेले असतात ना ?
मुंबईतील बर्याच रेल्वेस्थानकांच्या बाहेर ‘शेअर टॅक्सी’ (भाडे आकारणार्या व्यावसायिक चारचाकीतून केवळ एकाच प्रवाशाला न नेता परवान्याच्या अनुरूप संख्येने प्रवासी नेणार्या टॅक्सी) असतात; परंतु त्यांचे मीटर ‘आर्.टी.ओ. पासिंग’ (प्रादेशिक परिवहन विभागाकडून मान्यताप्राप्त) झालेले असते कि नाही ? याकडे ‘आर्.टी.ओ.’चे लक्ष नसते किंवा ते दुर्लक्ष करतात. यामध्ये त्यांचा काहीतरी लाभ असणार, असे लक्षात येते. याकडेही प्रशासनाने नियमावली करून योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.
वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, साधक, राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना आवाहन
या लेखात म्हटल्याप्रमाणे रिक्शा आणि टॅक्सी यांच्याविषयीच्या समस्या लक्षात आल्यास त्याविषयी कळवा.

टपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरकटे
‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
संपर्क : ९८६७५५८३८४
संगणकीय पत्ता : [email protected]
‘एक्स’ खाते : surajyacampaign
५. रिक्शा आणि टॅक्सी यांच्या चालकांमध्ये परप्रांतीय अन् अन्य धर्मीय यांचा वाढता सहभाग
रिक्शा आणि टॅक्सी यांच्या चालकांमध्ये परप्रांतीय अन् अन्य धर्मीय यांचा अधिक भरणा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक लोक अत्यंत न्यून आहेत, ही धोक्याची सूचना आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? खरेतर महाराष्ट्रातील लोकांनी अन्य राज्यात नोकर्या शोधण्यापेक्षा वाहन चालवायला शिकून घ्यायला हवे किंवा ते अन्य लोकांच्या गाड्या भाडेतत्त्वावर चालवू शकतात.
– एक वाचक
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !