|

नवी देहली – ‘जमियत उलमा-ए-हिंद’चे अध्यक्ष महमूद मदनी यांनी जिहाद हा इस्लाममध्ये पवित्र असल्याने त्याचा शाळांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. समाजात जिहादची संकल्पना चुकीच्या पद्धतीने रंगवण्यात आले आहे. त्यामुळे शाळांमध्ये जिहाद शिकवल्यास मुलांना त्याचा खरा अर्थ कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आय.ए.एन्.एस्. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचे विचार मांडले. काही दिवसांपूर्वी मदनी यांनी ‘जेव्हा अन्याय होईल, तेव्हा जिहाद होईल’, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
मदनी पुढे म्हणाले,
१. जे ‘जिहाद’ला विरोध करतात, ते विश्वासघातकी असून असे लोक आतंकवाद पसरवण्याचे काम करत आहेत.
२. जिहाद ही एक लक्षणीय गोष्ट असून त्याची केवळ मुसलमानांनाच नव्हे, तर देशाला आवश्यकता आहे.
३. इस्लामच्या नावाने आतंकवाद करणे, हे चुकीचे आहे. देहलीमध्ये बाँबस्फोट घडवून आणणारा आतंकवादी उमर महंमद याने आत्मघातकी आक्रमणे करणे, हे ‘शहीद होण्यासाठी केलेल्या कारवाया’, असे म्हटले होते. त्यावर माझा आक्षेप आहे.
४. मानवतेवर केलेले आक्रमण जिहादच्या नावाने केलेले असेल, तर ते इस्लामवर आक्रमण ठरते.
५. निरपराध माणसे जिहादच्या नावावर मारली गेल्यावर आम्हाला वाईट वाटते; कारण असे कृत्य इस्लामचे नाव घेऊन केलेले असते. वास्तविक आतंकवाद संपुष्टात आणणे, हाच खरा जिहाद आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय