(म्हणे) ‘मुसलमान विद्यार्थी ‘अल्-फलाहा’मध्ये जाऊन कट्टरतावादी बनले, तर त्याला दोषी कोण?’ – Omar Abdullah

श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्याच्या प्रवेशावरून झालेल्या वादावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा आतंकवाद्यांचे समर्थन करणारा प्रश्न !

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – विद्यार्थी एखाद्या वैद्यकीय संस्थेत जातांना नाव किंवा निधी कुठून येतो ?, हे पहात नाहीत, ते केवळ शिक्षणाचा विचार करतात. ते डॉक्टर होण्याचे स्वप्न पहातात. अशा विद्यार्थ्यांना धर्माच्या आधारे प्रवेश नाकारला आणि ते अल्-फलाह विद्यापिठात जाऊन कट्टरतेकडे वळले, तर त्याला कोण उत्तरदायी असेल ?, असा प्रश्न जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. जम्मूमधील श्री माता वैष्णोदेवी ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला हिंदुत्वनिष्ठ संघटना विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला यांनी हा प्रश्न संघटनांना विचारला. ते पुढे असेही म्हणाले, ‘जर संस्थेचा उद्देश एखाद्या विशिष्ट समाजासाठी जागा राखून ठेवण्याचा होता, तर उभारणीच्या वेळी तिला अल्पसंख्यांक संस्थेचा दर्जा का देण्यात आला नाही ? दर्जा दिला असता, तर वादच निर्माण झाला नसता.’ ते येथे पत्रकारांशी बोलत होते. (जर अब्दुल्ला सांगत आहे, तसे केल्याने मुसलमानांना तेथे प्रवेशबंदी होऊ शकत असेल, तर आता हिंदूंनी ही मागणी करून तसा दर्जा देण्यास भाग पाडावे ! – संपादक)

प्रवेशप्रक्रिया ही केवळ पात्रता परीक्षांवर आधारित !

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, प्रवेशप्रक्रिया ही केवळ ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असते) आणि इतर पात्रता परीक्षा, यांवर आधारित आहे, त्यात धर्माचा विचार केला जात नाही. जर संस्थेत विशिष्ट समाजाचे विद्यार्थीच नको असतील, तर तिला ‘अल्पसंख्यांक संस्था’ घोषित करावी. मग मुसलमान आणि शीख विद्यार्थी तेथून निघून इतरत्र प्रवेश घेतील. (शीख हिंदूंपेक्षा वेगळे नसल्याने त्यांना कुणीही विरोध करणार नाही. अब्दुल्ला यांनी हिंदू आणि शीख यांच्यात भेद करू नये आणि मुसलमान अन् शीख यांना एक समजू नये ! – संपादक)

प्रवेश गुणवत्तेच्या आधारे !

ओमर अब्दुल्ला यांनी नमूद केले की, ज्यांना प्रवेश मिळाला आहे, त्यांना तो गुणवत्तेच्या आधारे मिळाला आहे. (अल्-फलाह विद्यापिठातील मुसलमान डॉक्टरांकडेही गुणवत्ता होती; मात्र त्यांनी त्याचा वापर जिहादी आतंकवादासाठी करत देशद्रोह केला ! – संपादक) त्यांना दुसरीकडे प्रवेश देता येईल; पण समाजावर आरोप करू नयेत. एखाद्या घटनेमुळे संपूर्ण समाजाला दोष देणे उचित नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘हिंदूंच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे मुसलमान विद्यार्थी आतंकवादी बनू शकत नाहीत’, तर ‘अल्-फलाहासारख्या विद्यापिठात गेल्यास ते आतंकवादी बनू शकतात’,  अशी निश्चिती ओमर अब्दुल्ला यांना असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते. यावरून अब्दुल्ला हे मान्य करत आहेत की, आतंकवादी कसे निर्माण होत आहेत ? आता त्यांनीच संपूर्ण देशातील अशा विद्यापिठांवर कारवाई करण्याची मागणी केली पाहिजे !
  • बहुतांश वेळा मदरशांत जे शिकतात, त्यांतीलच अनेकदा जिहादी आणि आतंकवादी बनतात, असेच समोर आले आहे. मग तेही बंद करायला हवेत, असेच ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावरून लक्षात येते. आता त्यांनी मदरशांवर बंदी घालण्यासाठी पुढे आले पाहिजे, म्हणजे मुसलमान आतंकवादी बनणार नाहीत !