भारतातील एका आध्यात्मिक संस्थेकडून हिंदु पंचांग प्रत्येक वर्षी सिद्ध करून ते प्रत्यक्ष आणि ‘अॅप’ स्वरूपात हिंदूंना उपलब्ध करून दिले जाते. ‘अॅप’ स्वरूपातील पंचांग ‘गूगल’च्या ‘प्ले स्टोअर’वर (अनेक अॅपचा संग्रह असलेली ‘ऑनलाईन’ प्रणाली जेथून स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये स्वतःला हवे असलेले अॅप डाऊनलोड करू शकतो) इतरांना डाऊनलोड करण्यासाठी अपलोड केल्यावर ते ‘गूगल’कडून ‘स्कॅन’ केले जाते. पंचांग ‘स्कॅन’ करतांना ‘गूगल’ची संगणकीय प्रणाली या पंचांगातील लिखाण, चित्रे असा सर्वच भाग ‘स्कॅन’ करते. या पंचांगामध्ये देवता, संत यांच्या सात्त्विक चित्रांसह हिंदु धार्मिक चिन्ह जसे ॐ, स्वस्तिक () यांचा उपयोग केलेला असतो. यांमधील स्वस्तिक चिन्ह स्कॅन करतांना प्रत्येक वेळी चेतावणी देणारे लिखाण येते, म्हणजे ‘गूगल’ने आधीच ठरवलेले आक्षेपार्ह शब्द, वाक्य, चिन्ह यांच्या सूचीत हा भाग येतो. परिणामी प्रत्येक वेळी ‘हे अॅप केवळ रशियात दिसणार नाही’, असा चेतावणी देणारा संदेश येतो, म्हणजेच ‘गूगल’च्या लेखी हिंदूंचे ‘स्वस्तिक’ चिन्ह आक्षेपार्ह आहे, अशी नोंद आहे. हा जाणीवपूर्वक केलेला हिंदूंचा द्वेष आणि अपमान आहे.

१. स्वस्तिक आणि हिटलरचे ‘हॅकेनक्रूझ’ हे चिन्ह !
स्वस्तिक आणि हिटलरचे ‘हॅकेनक्रूझ’ या चिन्हात खरेतर पुष्कळ भेद आहे. या दोघांची कोणतीच तुलनाही होऊ शकत नाही. स्वस्तिक चिन्हाला तर अगणित वर्षांचा इतिहास आहे, तर हॅकेनक्रूझला १०० वर्षांचाही इतिहास नाही.
२. ‘जेमिनी एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्तेची प्रणाली)ने ‘स्वस्तिक’ आणि ‘हॅकेनक्रूझ’ यांमध्ये दाखवलेला भेद
या विषयात पुढे जाण्यापूर्वी ‘गूगल’च्या ‘जेमिनी एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्तेची प्रणाली) या दोघांविषयी काय म्हणते, ते पाहूया.
‘स्वस्तिक’ आणि ‘हॅकेनक्रूझ’ या चिन्हांमध्ये महत्त्वाचा अन् मूलभूत भेद आहे, जरी ती दिसण्यात थोडी सारखी वाटू शकतात. या दोघांतील भेद खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतो :


थोडक्यात ‘स्वस्तिक’ हे शुभ, शांतता आणि कल्याणाचे प्राचीन, धार्मिक अन् आदरणीय प्रतीक आहे. ‘हॅकेनक्रूझ’ हे द्वेष, हिंसा आणि क्रौर्याचे आधुनिक राजकीय प्रतीक आहे, जे नाझींनी वापरले. या दोन्ही चिन्हांचा उद्देश आणि इतिहास पूर्णपणे वेगळा आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये अनेकदा चुकीने नाझी चिन्हाला ‘स्वस्तिक’ म्हटले जाते, ज्यामुळे हिंदु आणि इतर धार्मिक समुदाय यांच्या पवित्र चिन्हांविषयी गैरसमज अन् अनादर निर्माण होतो.

२ अ. ‘गूगल’कडून जाणीवपूर्वक हिंदु धार्मिक चिन्हाचा अवमान करण्याचा प्रयत्न : वरील भेद जाणीवपूर्वक ‘जेमिनी’ या ‘गूगल’च्या ‘एआय’द्वारे घेण्याचे कारण, म्हणजे ‘गूगल’चे ‘प्लेस्टोअर’ एका बाजूला स्वस्तिकचा समावेश ‘आक्षेपार्ह लिखाण’ म्हणून करते, तर त्यांचीच कृत्रिम बुद्धीमत्तेची प्रणाली त्याचा योग्य अर्थ सांगते. एकाच आस्थापनाकडून स्वस्तिकच्या आकलनात एवढा भेद कसा काय ? ‘प्लेस्टोअर’च्या प्रणालीतील अल्गोरिदमला योग्य सूचना ‘गूगल’ने दिलेल्या नाहीत आणि जाणीवपूर्वक हिंदु धार्मिक चिन्हाचा अवमान करणे, अपकीर्त करण्याचा हा प्रयत्न आहे. हासुद्धा साम्यवादी मानसिकतेचाच प्रकार आहे.
२ आ. ‘गूगल’ भाषांतर प्रणाली : ‘हॅकेनक्रूझ’चा मराठी अर्थ ‘गूगल’ भाषांतर प्रणालीला विचारला, तरी ‘गूगल’द्वारे अर्थ ‘नाझी स्वस्तिक’, असाच केला जातो.
‘जेमिनी एआय’चा ठळकपणे दिसणारा हिंदुद्वेष !

१. हिंदु देवतांविषयी करण्यात येणारा विनोद
‘जेमिनी एआय’ला ‘हिंदु देवता गणपति, श्रीविष्णु यांच्याविषयी विनोद हवा’, असे सांगितल्यास तो ‘हलका फुलका, गोड, आदरयुक्त विनोद सांगतो…’, असा प्रारंभ करून त्यांच्याशी संबंधित विनोदी कथा किंवा प्रत्यक्ष विनोदच उपलब्ध करून देतो आणि वर पौराणिक कथांविषयी आणखी माहिती किंवा विनोद हवा आहे का ? अशी विचारणाही करतो.
याविषयीचे उदाहरण खालीलप्रमाणे –
‘एकदा नारदमुनी वैकुंठात आले आणि त्यांनी पाहिले की, भगवान विष्णु शेषनागाच्या पलंगावर शांतपणे योगनिद्रेत आहेत.
नारदांनी देवी लक्ष्मींना विचारले,
‘‘माता, भगवान विष्णु नेहमीच झोपलेले दिसतात ! एवढी काय चिंता आहे त्यांना ?’’
लक्ष्मीदेवी हसून म्हणाल्या,
‘‘तुम्ही काळजी करू नका, नारद ! ते झोपलेले नाहीत. ते फक्त त्यांच्या १० अवतारांच्या ‘नवीन अॅप अपडेट्स’बद्दल विचार करत आहेत; कारण या जगात आता ‘सेटिंग्ज’ पुष्कळ बदलल्या आहेत !’’
टीप : ‘भगवान विष्णु हे सृष्टीचे पालक आणि पालनकर्ता आहेत, त्यांच्याबद्दल आदर राखणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला पौराणिक कथांवर आधारित आणखी काही माहिती किंवा विनोद हवा आहे का ?’
(वरील लिखाण वाचून ज्यांचे रक्त सळसळत नाही, ते हिंदूच नाहीत. वरील लिखाण भावना दुखावण्यासाठी नव्हे, तर वस्तूस्थिती समजण्यासाठी या लेखात दिले आहे.)
२. एका पंथियांच्या प्रमुखाविषयी विनोद विचारल्यावर येणारे उत्तर
या उलट आता एका पंथियांच्या प्रमुखाविषयी विनोद विचारल्यास ‘मी तुम्हाला **** यांच्याबद्दल कोणताही विनोद सांगू शकत नाही.’
‘**** हे *** धर्माचे संस्थापक आणि अत्यंत आदरणीय *** आहेत. त्यांच्याबद्दल आदर राखणे आणि कोणत्याही प्रकारची थट्टा किंवा विनोद करणे हे अयोग्य आणि अनुचित आहे.’‘तुम्हाला इतर कोणत्याही सामान्य विषयावर विनोद किंवा माहिती हवी असल्यास मी नक्कीच मदत (साहाय्य) करू शकेन.’
३. आणखी एका पंथाच्या प्रमुखाविषयी विनोद विचारल्यावर
‘मी तुम्हाला ** ** यांच्याबद्दल कोणताही विनोद सांगू शकत नाही.’
‘** ** हे ** धर्माचे अत्यंत पवित्र आणि पूजनीय दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विनोद करणे किंवा त्यांची थट्टा करणे हे अयोग्य आणि अनादरयुक्त ठरू शकते. मी सर्व धार्मिक व्यक्तीमत्त्वांचा आदर करतो.’
‘तुम्ही इतर कोणत्याही सामान्य विषयावर किंवा गैरधार्मिक विषयावर विनोद विचारू शकता किंवा माहिती घेऊ शकता. मी तुम्हाला नक्कीच मदत (साहाय्य) करीन.’
याचाच अर्थ एकच कृत्रिम बुद्धीमत्ता असलेली माहिती देणारी सुविधा; मात्र हिंदु धर्म आणि अन्य पंथ यांच्याविषयी आदर, संवेदनशीलता, गांभीर्य यांच्याविषयी एवढा टोकाचा फरक ! याचे कारण म्हणजे हा अल्गोरिदम लिहिणारी हिंदुद्वेषी मानसिकता !
– श्री. यज्ञेश सावंत
३. स्वस्तिकला पाश्चात्त्य देशांत विरोध !
वर्ष २०१५ मध्ये अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यालयाने स्वस्तिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला; मात्र हिंदूंनी याचा तीव्र विरोध केल्यावर बंदी घालण्याचा निर्णय रहित केला जातो. वर्ष २०२० मध्ये अमेरिकेतील ब्रँडेईस विद्यापिठातील हिंदु विद्यार्थिनी सिमरन तातुस्कर यांनी ‘स्वस्तिक हे शांततेचे प्रतीक’ म्हणून सांगत विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात त्याविषयी एक धडा समाविष्ट करण्याचा मागणी केली. तिच्या या मागणीनंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर निदर्शने झाली. परिणामी तिला क्षमा मागत मागणी मागे घ्यावी लागली. वर्ष २०२१ मध्ये पुन्हा मेरिलँड राज्यात स्वस्तिकवर बंदी घालण्यासाठी पुन्हा मोहीम चालू करण्यात येते. या वेळीही हिंदूंनी तीव्र विरोध केल्यामुळे मोहीम थांबवली गेली.
४. स्वस्तिकच्या अपकीर्ती मागे पाश्चात्त्यच !
अ. हुकूमशहा हिटलरच्या ‘हॅकेनक्रूझ’चा इतिहास : आता थोडे इतिहासात डोकावल्यावर हुकूमशहा हिटलरचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींचा मागोवा थोडक्यात घ्यावा लागणार. हिटलर स्वत: ख्रिस्ती धर्माने प्रभावित होता. तो बालपणी चर्चमध्ये जायचा. ख्रिस्ती पंथाशी विविध पुस्तके, ख्रिस्ती धर्मोपदेशक यांची थडगी, वास्तूकला यामध्ये त्याला ‘हॅकेनक्रूझ’च्या आकाराशी मिळतेजुळते चिन्ह आढळले आहे. यातील काही वास्तू या ८ व्या शतकातील आहेत. ख्रिस्ती पंथाशी संबंधित पुस्तकांमध्ये या चिन्हाचा ‘गॅमेडिअन’ म्हणून उल्लेख आहे, म्हणजे ४ गॅमा (इंग्रजीतील उलटे एल् हे अक्षर) एकत्र केल्यावर जे चिन्ह सिद्ध होते, ते म्हणजे गॅमेडिअन आहे. याचाच अर्थ हे अधिकतर ख्रिस्ती पंथाशी संबंधित चिन्ह आहे. विदेशात ख्रिस्ती धर्मीय लोक थेट ख्रिस्ती ‘क्रॉस’चा उपयोग करण्याऐवजी हे चिन्ह स्वत:च्या रक्षणासाठी उपयोग करत असल्याचे उल्लेख आढळतात. या चिन्हाचाच उपयोग हिटलरने त्याचे सैन्य आणि त्यासंबंधी विविध विभाग यांसाठी केला असण्याची शक्यता आहे.
आ. प्रा. मॅक्समुलर यांनी दर्शवलेला विरोध : भारतातील बर्याचशा हिंदु साहित्याचा पाश्चात्त्य दृष्टीने लिखाण करून भ्रम पसरवणारे विद्वान (? कि ब्रिटिशांचा चमचा) प्रा. मॅक्समुलर यांनी त्यांचा एक मित्र सायमन यांना स्वस्तिकविषयी सांगितले की, हा ‘Sv-sti-ka’ हा ग्रीक शब्द असून तो उजव्या दिशेला असतो, तर याच्या उलट दिशेला चिन्ह आहे, ते म्हणजे हिंदूंचे स्वस्तिक आहे. स्वस्तिक हा शब्द भारताबाहेर वापरण्यास माझा विरोध आहे. भारतात या शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. अशा आकृत्यांना स्वस्तिक म्हटल्यास ‘क्रॉस’ची उत्पत्ती भारतातून झाली, असा होईल आणि हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
इ. ब्रिटिशांचे कारस्थान : ब्रिटिशांना भारतात ‘फोडा आणि झोडा’ या धोरणाचाच अवलंब करायचा होता; कारण भारतात मोगलांचे राज्य अनेक शतके असले, तरी हिंदू हे धर्माचरणी आणि धर्मावलंबी असल्याने त्यांना सहज राज्य करता येत नव्हते. ब्रिटिशांनी केलेल्या अनेक कारस्थानांपैकी एक म्हणजे स्वस्तिकचा अपप्रचार ! त्यांना याचा उपयोग भारतात आर्यांच्या विरुद्ध इतरांना भडकवण्यासाठी केला. ‘आर्यांचे स्वस्तिक हे हिटलरच्या हॅकेनक्रूझशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे त्यांना विरोध केला पाहिजे’, असा हा अपप्रचार होता. याचा अर्थ ब्रिटिशांनी ठरवूनच ‘स्वस्तिक म्हणजे हॅकेनक्रूझ आहे’, असा प्रचार केला आणि ते इंग्रजी साहित्यात स्वीकारले गेले, मान्यता पावले आणि तेथूनच ही अपकीर्ती पाश्चात्त्य विद्वान, लेखक, तत्त्वज्ञानी यांच्या साहित्यात दिसते. प्रख्यात वक्ते राजीव मल्होत्रा यांनी सांगितले की, ‘ब्रिटिशांनी तर नाझी, म्हणजे वेदांना मानणारे लोक होते’, असा अपप्रचार केला होता, जेणेकरून हिंदू विशेषत: वेदांचे संरक्षण करणारे ब्रह्मवृंद, पुरोहित, वेदमूर्ती यांची अपकीर्ती होईल आणि लोक त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देत शिकवणीपासून दूर जातील. याद्वारे भारताची संस्कृती आणि सभ्यता नष्ट करून कायमस्वरूपी भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणता येईल.
५. रशियात ‘स्वस्तिक’ चिन्ह स्वीकारार्ह का नाही ?
आध्यात्मिक संस्थेच्या पंचांगाच्या ‘अॅप’मध्ये स्वस्तिकचे चिन्ह आल्यामुळे ते रशियात दाखवले जाणार नाही; कारण रशियावर नाझी जर्मनीने आक्रमण करून भयंकर रक्तपात केला होता; मात्र रशियाने नाझी जर्मनीला युद्धात हरवले होते. त्यामुळे त्याची आठवण जपत रशियाचे नागरिक आजही नाझींचा विरोध करतात, त्याच्याशी संबंधित गोष्टींवर आक्षेप घेतात. तसे तेथे कायदे असले, तरी ब्रिटीश, पाश्चात्त्य हिंदुद्वेषी विचारवंत आणि प्रामुख्याने धर्मांध ख्रिस्ती यांनी केलेल्या अपप्रचारामुळे स्वस्तिकविषयी घृणा आणि ‘क्रौर्याचे प्रतीक’ असा अर्थ घेतला जात आहे.
६. राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी करावयाचे प्रयत्न
स्वस्तिकविषयी होणारा अपप्रचार मोडून काढण्यासाठी, तसेच त्याचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंना वैध मार्गाने संबंधित यंत्रणांना पत्र लिहिणे, केंद्रशासनाला ‘स्वस्तिक’ला राष्ट्रीय धार्मिक चिन्ह म्हणून मान्यता देण्याविषयी निवेदने देणे, ‘गूगल’ला योग्य अर्थ समाविष्ट करण्यास सांगणे, आंतरराष्ट्रीय शब्दकोषांमध्ये योग्य अर्थ समाविष्ट करणे इत्यादी विविध मार्गांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (१९.११.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप