(तबलिगी जमात म्हणजे मुसलमानांमध्ये धार्मिक आचरण वाढवण्यासाठी प्रचार करणारी इस्लामी धार्मिक चळवळ)

नवी देहली – जिहादी डॉक्टरांच्या आतंकवादी गटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी डॉक्टर शाहीन आणि तबलिगी जमात यांचे संबंध समोर आले आहेत. डॉ. शाहीन हिला तबलिगी जमातकडून आतंकवादी कारवायांसाठी पुरवठा होत होता. या पैशांतूनच बाँब बनवण्यासाठी स्फोटके विकत घेतली गेली, अशी माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आता तबलिगी जमातला प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि छायाचित्रे गुप्तचर विभाग आणि आतंकवादविरोधी पथक यांना देण्याचे आदेश दिले गेले आहेत. कोरोना महामारीच्या पूर्वीही अशा प्रकारचे लक्ष ठेवण्यात येत होते; मात्र नंतर त्यात काही शिथिलता आली होती.
🚨 Reports: Tablighi Jamaat allegedly funded Dr. Shaheen through Zakat money for terror-linked activities.
If such extremist financing is proven, then
👉 🇮🇳 It’s time to declare Tablighi Jamaat a terrorist organisation and ban its operations in India.Jamaat was also accused… https://t.co/hwEW3ZOWve pic.twitter.com/9tKc41WfkZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 19, 2025
१. डॉ. शाहीनच्या ७ बँक खात्यांत मागील ७ वर्षांत १ कोटी ५५ लाख रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. यामध्ये वर्ष २०१४ मध्ये ९ लाख, वर्ष २०१५ मध्ये ६ लाख, वर्ष २०१६ मध्ये ११ लाख आणि वर्ष २०१७ मध्ये १९ लाख रुपयांचे हस्तांतरण झाले. आता या ही रक्कम कुणाला पाठवली आणि कुणाला दिली, याची चौकशी केली जात आहे.
२. आतंकवाद्यांच्या अन्वेषणात २५ ते ३० भ्रमणभाष क्रमांक सापडले आहेत, जे बंद आहेत. श्रीनगर, पहलगाम, पठानकोट, देहली, सहारनपूर, हापुड, मुरादाबाद, बिजनौर यांसह दुबई, ओमानपर्यंत आतंकवाद्यांचे संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. येथे आतंकवादी गोपनीय पद्धतीने बैठकांमध्ये सहभागी झाले होते. गुप्तचर यंत्रणांना इस्लामी देशांमध्ये असलेल्या काही संस्थांची माहिती मिळाली आहे. या संस्थांच्या खात्यांची चौकशी चालू आहे.
तबलिगी जमातने ‘जकात’चे पैसे आतंकवाद्यांना दिले !
तबलीगी जमातला ‘जकात’द्वारे (मुसलमानांनी त्यांच्या संपत्तीचा काही भाग धर्मादाय करण्यासाठी दान करणे) पैसे मिळत असतात. हेच पैसे तबलिगी जमातने डॉ. शाहीन हिला दिल्याची माहिती मिळाली आहे.
संपादकीय भूमिकातबलिगी जमातला आता आतंकवादी संघटना घोषित करून भारतात बंदी घालण्याचीच आवश्यकता आहे. कोरोना महामारीच्या काळातही कोरोना पसरवण्याचा या संघटनेवर आरोप झाला होता ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !