गुजरातमध्ये अटक करण्यात आलेल्या ३ जिहादी आतंकवाद्यांनी दिली माहिती

कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेल्या डॉ. मोहिउद्दीन, सोहेल आणि आजाद सैफी या ३ जिहादी आतंकवाद्यांच्या चौकशीत त्यांनी मान्य केले की, ते नवी देहली, लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) आणि कर्णावती येथील प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांना प्रसादाच्या माध्यमातून लक्ष्य करण्याची भीषण योजना आखत होते. ते प्रसादात अत्यंत घातक ‘रिसिन’ नावाचे विष मिसळून मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव घेण्याची सिद्धता करत होते. पथकाला शंका आहे की, या तिघांसह अजून लोक या कटामध्ये सहभागी असू शकतात.
⚠️ Ricin Poison Plot in Temple prasadam
A shocking revelation from 3 terrorists arrested in Gujarat – there was a plan to kill Hindus by mixing poison in temple prasad 🕉️☠️
Those who deny or downplay such terror – the so-called seculars and progressives must be held accountable… pic.twitter.com/e57ZorrVYW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2025
‘रिसिन’ विष आणि ऑनलाईन प्रशिक्षण

पथकाच्या माहितीनुसार हे तिघे थेट अफगाणिस्तानमधील त्यांचा सूत्रधार ‘अबू खदीजा’शी संपर्कात होते. त्याने त्यांना दूरभाषवरून ‘रिसिन’ बनवण्याची पूर्ण पद्धत सांगितली होती, तसेच लक्ष्मणपुरीतील हनुमान सेतू मंदिर, कर्णावतीमधील जगन्नाथ मंदिर आणि देहलीतील प्रमुख मंदिरांची छायाचित्रे अन् व्हिडिओ पाठवून पहाणी करवून घेतली होती.
‘जैविक शस्त्र’ म्हणून वापर
‘रिसिन’ हे एरंडीच्या बियांपासून निर्माण होणारे अतिशय घातक द्रव्य आहे. तज्ञांच्या मते याचे केवळ १ मिलिग्रॅम प्रमाणही मनुष्याला ठार मारण्यासाठी पुरेसे ठरते. अटकेच्या वेळी त्यांच्याजवळ रिसिनचा साठाही आढळला आहे. पोलीस त्याकडे ‘जैविक शस्त्र’ म्हणून पहात आहे. हा नमुना चाचणीसाठी न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
प्रसादात विष मिसळण्याचे प्रशिक्षण
आतंकवाद्यांनी सांगितले की, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे प्रसादात ‘रिसिन’ ओळखता येणार नाही, अशा पद्धतीने मिसळण्याची पद्धत शिकवली गेली होती. त्यांच्या सूत्रधाराने आदेश दिला होता की, धार्मिक स्थळांवर आक्रमण करून भय निर्माण करा, समाजात फूट पाडा.
उत्तरप्रदेशापर्यंत पसरलेले जाळे
आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणानुसार हे आक्रमण एखाद्या मोठ्या उत्सवाच्या किंवा मेळ्याच्या काळात करण्याचा विचार होता. डॉ. मोहिउद्दीन रासायनिक ज्ञानामुळे ‘रिसिन’ सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत मुख्य सूत्रधार होता. सोहेल आणि आजाद यांचा संबंध मुझफ्फरनगर येथील एका मदरशाशी होता अन् ते खुरासान गटाशी जोडलेले होते. सध्या उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथक गुजरातमध्ये असून सोहेल आणि आजाद यांच्या जाळ्याचा शोध घेत आहे.
The Gujarat ATS has busted a terror module, arresting three individuals with a cache of arms and ammunition. My compliments to ATS which has once again exhibited its capabilities for painstaking intelligence collection and smooth operations. @GujaratPolice remains steadfast.… pic.twitter.com/Fp6pU9VypL
— DGP Gujarat (@dgpgujarat) November 9, 2025
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !