१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवाच्या सेवेत सहभागी झालेले शासकीय कर्मचारी, पोलीस आणि आधुनिक वैद्य यांनी ५.६.२०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिला. आश्रम पाहिल्यावर त्यांनी दिलेले काही अभिप्राय ७ नोव्हेंबर या दिवशी पाहिले. आज त्यापुढील अभिप्राय येथे दिले आहेत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/974323.html

८. डॉ. पूजा गावडे, तळावली, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमाचा परिसर नीटनेटका असून सकारात्मकतेने भारलेला आहे.
आ. आश्रमातील साधक मृदूभाषी असून त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते.
इ. आश्रमातील एकूण वातावरण आशावादी असून आध्यात्मिक प्रगतीस पूरक आहे.’
९. डॉ. आलरीझा फर्नांडिस, चिखली, गोवा.
अ. ‘आश्रम म्हणजे ‘सकारात्मकता, स्वच्छता आणि उत्तम नैतिकमूल्ये’ यांचा सुरेख संगम आहे.
आ. आश्रमाच्या प्रत्येक कोपर्यात निखळ आनंद अनुभवता येतो.
इ. आश्रमातील समर्पित साधकांनी प्रेमाने आणि आदराने आमचे स्वागत केले.
पुष्कळ सुंदर आध्यात्मिक अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद ! ‘या कार्याचा अधिकाधिक विस्तार व्हावा आणि समाजात सकारात्मकता वाढावी’, हीच शुभेच्छा !’
१०. श्री. अनिकेत के. मडकईकर, हवेली-कुर्टी, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमात येऊन मला पुष्कळ शांत आणि समाधानी वाटले.
आ. ‘येथे स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते’, याची मला जाणीव झाली.
इ. आश्रमात सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमाला पुन्हा भेट देण्याची माझी इच्छा आहे.’
११. स्नेहा तुळसकर, मळा, पणजी, गोवा.
अ. ‘आश्रमाचे उत्तम व्यवस्थापन आणि कानाकोपर्यांत असलेली सकारात्मक ऊर्जा मनाला शांती अन् स्थैर्य देते.
आ. साधकांची निष्ठा पाहून मी भारावून गेले.
इ. ‘सनातन संस्थे’ची स्थापना होऊन पुष्कळ वर्षे झाली; पण आज मला तिचे कार्य जवळून पहाण्याची संधी मिळाली. आश्रमाला पुन्हा भेट देऊन अधिक माहिती घेण्याची माझी इच्छा आहे.’
१२. श्री. रिचर्ड फर्नांडिस, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमात मला आध्यात्मिक वातावरण जाणवले. येथे मला सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने यांच्याविषयी माहिती मिळाली, उदा. ‘नमस्कार’ हा शब्द उच्चारल्यावर सकारात्मक स्पंदने, तर ‘हॅलो’ हा शब्द उच्चारल्यावर नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. इतिहासातील काही सत्य घटनांची, तसेच सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतील सत्यतेविषयीही मला माहिती मिळाली.
आ. आश्रम पहाणे, हा एक अनोखा, आगळावेगळा आणि अप्रतिम असा अनुभव होता. मी, मित्र आणि कुटुंबीय यांच्या समवेत आश्रमाला नक्कीच पुन्हा भेट देईन !’
(क्रमशः)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/975400.html
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती