१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवाच्या सेवेत सहभागी झालेले शासकीय कर्मचारी, पोलीस आणि आधुनिक वैद्य यांनी ५.६.२०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिला. आश्रम पाहिल्यावर त्यांनी दिलेले काही अभिप्राय ८ नोव्हेंबर या दिवशी पाहिले. आज उर्वरित अभिप्राय येथे दिले आहेत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/974681.html

१३. मारिया अल्मेदा, मडगाव, गोवा.
अ. ‘नितांत सुंदर अशी रचना असलेला सनातनचा आश्रम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका आहे. स्वयंपाकघराचे व्यवस्थापन उत्तम आहे.
आ. आश्रमातील साधकांचे समर्पण पाहून मी पुष्कळ प्रभावित झाले. आश्रम दाखवणार्या साधकांनी आश्रमाविषयी अतिशय सुंदर माहिती सांगितली.’
१४. श्री. अमन कैलास नाईक (तांत्रिक साहाय्यक, जलपुरवठा विभाग, फोंडा), म्हार्दोळ, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमात मला पुष्कळ उत्कट शांतीचा अनुभव आला. ‘आध्यात्मिकदृष्ट्या माझ्यात शांतीचा किती अभाव आहे ?’, याची मला जाणीव झाली.
आ. आश्रम पाहिल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात मनात निर्माण होणारे काही दृष्टीकोन नक्कीच पालटले.
इ. मला आश्रमात प्रचंड सकारात्मक ऊर्जा जाणवली.
पुन्हा लवकरच आश्रमात येण्याची माझी इच्छा आहे. आपल्या सुंदर आदरातिथ्याबद्दल धन्यवाद !’
१५. श्री. शुभम् बांदोडकर, साखळी, गोवा.
अ. ‘आश्रमात मला अंतर्बाह्य सकारात्मक ऊर्जा जाणवली. येथे ‘शांतता आणि उत्साह’ असे दोन्ही जाणवते.
आ. आश्रमात स्वच्छतेची चांगली काळजी घेतली आहे. आश्रमाला भेट दिल्याने मला पुष्कळ आनंद झाला.’
१६. सौ. विपुला राजन प्रभु, दुर्गाभाट, फोंडा, गोवा.
अ. ‘आज मी आश्रम पाहिला. आजवर आयुष्यात मी इतका चांगला अनुभव कधीच घेतला नव्हता.
आ. मी सनातनच्या सर्व साधकांचे आभार मानते आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करते.
इ. ‘नामजप करणे’ हे कुटुंब आणि समाज यांच्या सकारात्मक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा !’
१७. जया सागर मोकतकर, तिस्क फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमातील सर्व सुविधा आणि साधकांचा समन्वय पाहून मला आनंद झाला.
आ. हे स्थान आकर्षक असून ते अध्यात्माचे महत्त्व पटवून देते.
इ. ‘आश्रमभेट’ ही माझ्यासाठी ईश्वरी कृपाच होती. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद !’
१८. श्री. यशराज के. तळपी, कुर्टी, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमातील वातावरण पुष्कळ शांत आहे आणि येथे सकारात्मक ऊर्जा जाणवते.
आ. येथील सात्त्विकता उच्चतम शिखरावर आहे.’
१९. सौ. शिल्पा राज बखले, खडपाबंध, फोंडा, गोवा.
अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये सहभागी होऊन मला पुष्कळ आनंद झाला. कार्यक्रमाची एकूण आखणी आणि आयोजन उत्कृष्ट होते.
आ. मी सनातनचा आश्रम पाहिला. तो अनुभवही पुष्कळ आनंददायी होता.’
(समाप्त)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !