रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या श्रीमती मधु मेहता यांची साधिकेला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

१. ‘मधुदीदी पुष्कळ प्रेमळ आहेत.
२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत, वय ४८ वर्षे) यांनी मधुदीदींना व्यष्टी साधनेचे नियोजन करून दिले आहे. त्यानुसार त्या दिवसभरात १० ते १२ स्वयंसूचना सत्रे करतात, तसेच स्वतःवरील त्रासदायक शक्तींचे आवरण काढतात आणि नामजपादी उपाय करतात. त्या प्रतिदिन दैनंदिनी लिहितात.
३. आज्ञापालन करणे
एकदा मधुदीदींना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मधुदीदींना ‘सेवा करा’, असे सांगितले होते. तेव्हापासून त्या धान्य निवडण्याची सेवा करत आहेत.
४. प्रांजळ

एकदा मी मधुदीदींशी बोलत होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘पूर्वी मी महाप्रसाद घेण्याच्या आधी प्रार्थना करत नव्हते; मात्र आता मला देवाच्या कृपेने प्रार्थना करण्याची आठवण होते आणि मी प्रार्थना करते. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो.’’
५. सेवेची तळमळ
अ. मधुदीदी धान्य निवडण्याची सेवा मन लावून करतात. आमचे धान्याशी संबंधित सेवा करण्याचे ठिकाण पालटले. तेव्हा मधुदीदींना काही कारणास्तव सेवा करता आली नाही. त्या वेळी त्यांनी प्रांजळपणे सांगितले, ‘‘आज मला सेवा करता आली नाही. उद्या मला अधिक सेवा द्या.’’
आ. त्या सतत सेवारत असतात. त्या सेवा करतांना कुणाशीही अनावश्यक बोलत नाहीत. त्यांना स्वतःचा वेळ वाया गेला, तर वाईट वाटते.
इ. त्या सेवा करतांना भ्रमणभाषवर नामजप लावतात आणि नामजप ऐकत सेवा करतात. त्या कानाला ‘इअरफोन’ (हेडफोन) लावून नामजप ऐकतात.
६. मधुदीदी यांच्यात जाणवलेले पालट
अ. पूर्वी त्या फारशा कुणाशी बोलत नसत. आता त्या सगळ्यांशी मोकळेपणाने बोलतात.
आ. मधुदीदींना त्यांची चूक सांगितली, तर त्या लगेच मान्य करतात.
इ. त्यांना सेवेतील एखादा पालट सांगितला की, त्या त्वरित स्वीकारतात.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, ‘मधुदीदींमधील गुण माझ्यातही येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते. ‘आपणच माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतलीत’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२६)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !