‘शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (धर्माभाऊ) हे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाशी संबंधित सेवा करतात. मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाचा समन्वय करण्याची सेवा करत होतो. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाच्या सेवेसंदर्भात माझा श्री. धर्मा नाईक यांच्याशी संपर्क होत असे. तेव्हा मला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. साहाय्यासाठी तत्पर असणे
मी धर्माभाऊंना कधीही भ्रमणभाष करून संपर्क केला, तरीही ते साहाय्यासाठी तत्पर असतात.
२. ते सेवेतील अडचणी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत असत.
३. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना काही अडचण आली, तर ते अन्य साधकांचे साहाय्य घेतात.

४. स्थिर आणि शांत राहून सेवा करणे
अ. धर्माभाऊंना काही वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे उशिरा मिळतात. तेव्हा ते त्याविषयी कधीच गार्हाणे करत नाहीत किंवा ते त्याविषयी कधीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.
आ. समाजातील काही वितरक प्रतीदिन शिरोडा येथे एका दुकानात दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा ठेवतात. समाजातील वितरक काही वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा फोंडा येथेच ठेवत असत. त्या वेळी धर्माभाऊंना दैनिक ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा घेण्यासाठी फोंडा येथे जावे लागते. अशा परिस्थितीतही ते स्थिर आणि शांत राहून सेवा पूर्ण करतात.
५. भाव
धर्माभाऊंमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ते नेहमी म्हणतात, ‘‘गुरुदेवांमुळेच मी ही सेवा करू शकतो. तेच माझ्याकडून सेवा करून घेतात.’’
धर्माभाऊंकडून मला ‘स्थिरता, सेवेची तळमळ आणि गुरुदेवांच्या प्रती भाव’, हे गुण शिकता आले. ‘त्यांच्यामधील हे गुण माझ्यामध्येही येऊ देत’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (८.६.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !