‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवाच्या सेवेत सहभागी झालेले शासकीय कर्मचारी, पोलीस आणि आधुनिक वैद्य यांनी ५.६.२०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिला. आश्रम पाहिल्यावर त्यांनी दिलेले अभिप्राय येथे दिले आहेत.

१. डॉ. नीलेश प्रमोद कोरडे, कुर्टी, फोंडा, गोवा.
अ. ‘आश्रमाच्या दिव्य वातावरणात आमचे अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आले. आश्रमात आम्हाला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावर निरागस हास्य होते. प्रत्येक साधक आपुलकीने वागत होता आणि त्या आपुलकीत प्रामाणिकपणा होता. आलेल्या सर्वांकडे त्यांचे विशेष लक्ष होते. असे म्हटले जाते की, व्यक्तीचे डोळे बोलतात किंवा व्यक्तीच्या देहबोलीतून तिचे प्रेम व्यक्त होते. आश्रमातील प्रत्येक साधक जणू याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
आ. साधकांची आत्यंतिक निष्ठा आणि समर्पण हे त्यांच्या साधनेच्या तळमळीचे द्योतक आहे. आश्रमात राबवला जाणारा आत्मपरीक्षणाचा सिद्धांत (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया) आत्मविकासासाठी एक सोपा मार्ग दाखवतो.
इ. येथील स्वच्छताही आश्रम आणि आश्रमवासी यांच्याविषयी सर्वकाही सांगून जाते.
ई. आश्रम अत्यंत सकारात्मक आणि दैवी अनुनादाने भारित आहे. हे कार्य दैवी आहे, हे निश्चित; कारण ईश्वरी अधिष्ठानाविना हे प्रचंड कार्य सिद्धीस जाणे अशक्य आहे आणि त्यामुळेच हे कार्य गरुडभरारी घेत पुढे पुढे जात आहे.
आश्रम पहाण्याची संधी मिळाल्याविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे.’
२. डॉ. शुभदा तळवडकर, सांताक्रूझ, फोंडा, गोवा.
अ. ‘सामान्य जनतेला आश्रमात होणारी शिबिरे आणि व्याख्याने यांविषयी माहिती मिळायला हवी, जेणेकरून अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल !’
३. श्री. सूरज नंदा काणकोणकर (फोंडा ‘ट्रॅफिक सेल’मध्ये कार्यरत), कुडचडे, गोवा.
अ. ‘मी आणि माझे सहकारी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये सहभागी झालो, याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला. तिथे सेवारत असलेल्या साधकांनी आम्हाला सनातन संस्थेविषयी माहिती दिली.
आ. आश्रम पहातांना आम्हाला अतिशय शांत आणि समाधानी वाटले.
इ. ‘हिंदुत्वाची जपणूक होऊ शकेल’, असे धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण आपल्या मुलांना दिले जावे’, असे मला सुचवावेसे वाटते.’
४. डॉ. (सौ.) अनुरा बाळे, बी.एस्.पी. गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, शिरोडा, गोवा.
अ. ‘आश्रमातील साधिकांनी आम्हाला प्रत्येक विभागाची माहिती नीट समजावून सांगितली. तेथील प्रत्येक साधक भक्तीभावाने सेवा करत होता. ‘साधकांकडून जगभर हिंदुत्वाच्या कार्याचा प्रसार व्हावा’, अशी मी आशा करते.
आ. येथील भोजन उत्कृष्ट होते.
ई. आम्हाला आश्रमात सर्वत्र आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.
‘सनातन आश्रमाला भेट देणे, हा आमचा पुष्कळ मोठा सन्मान होता’, असे मी मानते.
५. डॉ. मिथुन बोंद्रे, काम्राल, कुडचडे, गोवा.
अ. ‘आश्रमाच्या भेटीत तेथे चालू असलेल्या विविध सेवा आणि संशोधन यांविषयी मला माहिती मिळाली.
आ. साधकांनी अध्यात्माविषयी चांगली माहिती सांगितली. आश्रमातील वातावरण उत्तम असून येथे चैतन्य जाणवते.
इ. येथील साधकांचे समर्पण अतुलनीय आहे.
ई. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणे का आवश्यक आहे ?’, याची मला स्पष्ट जाणीव झाली.
‘अधिकाधिक लोकांनी, विशेषतः कुटुंब आणि मुले यांनी या आश्रमाला भेट द्यावी अन् येथील गोष्टी अनुभवाव्यात’, असे मला मनापासून वाटते.’
६. डॉ. बाळकृष्ण गावडे, सीमेपायण, म्हार्दाेळ, गोवा.
अ. ‘आश्रमातील स्वच्छता आणि व्यवस्थितपणा वाखाणण्याजोगा आहे.
आ. आश्रमातील साधक कुशल आणि सभ्य आहेत. आश्रम दाखवणार्या साधकांनी सनातन संस्थेविषयी पुष्कळ माहिती दिली.
इ. आश्रमात आल्यानंतर मला अत्यंत समाधान वाटले.
ई. आश्रमातील सात्त्विक जेवण अतिशय स्वादिष्ट होते.
आपण सर्वजण एकत्र येऊन हिंदु राष्ट्र घडवूया.’
७. डॉ. अंकिता मंगेशकर, प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच्.सी. फोंडा), मंगेशी, गोवा.
अ. ‘आश्रमात प्रवेश करताच मला सकारात्मकता आणि शांतता जाणवली.
आ. आश्रम परिसर पुष्कळ स्वच्छ आणि नीटनेटका आहे. येथे सर्वकाही नीटनेटके आणि स्वच्छ ठेवलेले आहे.
इ. आश्रम दाखवणार्या साधकाने सर्व माहिती उत्तमरित्या समजावून सांगितली.
ई. येथील जेवण पुष्कळ चविष्ट होते.’
(क्रमशः)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
वैचारिक प्रगल्भता आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या दैवी बालिका कु. आराधना धाटकर अन् कु. शर्वरी कानस्कर !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !