३१ ऑक्टोबर या दिवशी ‘द ताज स्टोरी’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मोगल बादशाह शाहजहां याने स्वत:ची प्राणप्रिय बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला, ताजमहाल त्याच्या प्रेमाचे प्रतीक आहे’, अशा कंड्या मागील अनेक वर्षे पिकवल्या गेल्या. भारताचा पुरातत्व विभाग, लेखक, कवी आणि देशातील अभ्यासक्रम यांमध्ये हा खोटा इतिहास दामटवून काँग्रेसने त्याला राजमान्यताही दिली. ‘सहस्रो महिला जनानखान्यात बाळगणारा पत्नीवर जिवापाड प्रेम करतो’, हा जसा विरोधाभास ठरतो, तसे ‘शहाजहांसारख्या स्त्रीलंपटाने ताजमहाल बांधला’, हे म्हणणे तितकेच हास्यास्पद आहे. ज्यांच्या शब्दकोशात स्थापत्यकला, खगोलशास्त्र, योगशास्त्र, वैद्यकशास्त्र आदी शब्दही सापडत नाहीत, त्यांना रचनाकार म्हणून गौरवण्यात आले. ते भारतात रचना करण्यासाठी नव्हे, विध्वंस करण्यासाठी आले होते; म्हणूनच महाराणा प्रताप, गुरुगोविंदसिंह, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या सहस्रो राष्ट्रधुरीणांनी त्यांना रोखले; मात्र त्याच आक्रमकांना स्वतंत्र भारतात काँग्रेसने शिरसावंद्य ठरवले. ताजमहाल, कुतूबमिनार, लाल किल्ला या वास्तूंवर हिंदु संस्कृतीची प्रतिके स्पष्ट आणि धडधडीत आहेत, तरीही या वास्तूंना ‘मोगलांची स्थापत्यकला’ म्हणून गौरवले गेले. यापूर्वी दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक पुरुषोत्तम नागेश ओक यांनी ‘भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका’, या त्यांच्या पुस्तकात ताजमहालसह मोगलवास्तू म्हणून खोटा इतिहास सांगितल्या जात असलेल्या वास्तूंची वस्तूस्थिती मांडली आहे. ‘द ताज स्टोरी’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने त्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकूया !
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई.

१. शहाजहांच्या दरबारातील बखरीमध्ये ‘ताजमहाल’चा उल्लेखही नाही !
‘शहाजहांने स्वत:ची पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ तिच्या कबरीवर ताजमहाल बांधला. ताजमहाल बांधण्यासाठी २२ वर्षे लागली आणि ज्यांनी ताजमहाल बांधला, त्या कामगारांचे हात कापण्यात आले’, अशी लोणकढी थाप सांगितली जाते. मुमताजवर इतके प्रेम होते, तर तिच्यासाठी बांधलेल्या ताजमहालचा शहाजहांच्या दरबारातील ‘बादशाहनामा’ या बखरीत उल्लेख तरी केला असता; मात्र त्यामध्ये ‘ताजमहाल’ या नावाचा साधा उल्लेखही नाही. ‘बादशाहनामा’मध्ये मुमताजच्या मृत्यूचा उल्लेख आहे; परंतु ‘ताजमहाल’चा नाही. हेच काय, तर औरंगजेब किंवा समकालीन मोगलांच्या कोणत्याही बखरीमध्ये ‘ताजमहाल’चा किंवा ‘ताजमहाल शहाजहां याने बांधला’, असा उल्लेख नाही.

२. शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही !
वर्ष १६३१ मध्ये मध्यप्रदेशातील बुर्हाणपूर येथे मुमताज हिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह बुर्हाणपूर येथे दफन करण्यात आला. त्यानंतर एक वर्षानंतर तिची कबर खोदून तिचे प्रेत आगरा येथे नेण्यात आले. तेथे जयपूरचा राजा जयसिंह याच्या उद्यानात हे प्रेत पुरले, असा उल्लेख ‘बादशाहनामा’ बखरीत पृष्ठ क्रमांक ४०२ आणि ४०३ यांवर आहे; परंतु तेथे तिच्या कबरीवर कोणत्या वास्तूची निर्मिती शहाजहांने केली, याचा पुसटचा उल्लेखही त्यात नाही. याचे कारण ताजमहालची निर्मिती शहाजहांने केलीच नाही. दुसरे म्हणजे एका बेगमचे बुर्हाणपूर येथे पुरलेले प्रेत एका वर्षानंतर पुन्हा उकरले जाईल, यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. याउलट आगरा येथे ज्या ठिकाणी मुमताज हिचे प्रेत पुन्हा पुरल्याचा संदर्भ या बखरीत आहे, त्यात ‘प्रेत पुरण्यासाठी निवडलेल्या जागेत एक सुंदर, रम्य बाग होती. त्यात घुमटाच्छादित, अप्रतिम सौंदर्यशाली ‘मानसिंहमहल’ नावाची इमारत होती. त्यात पुढील वर्षी मुमताजला पुरली. त्या उद्यानाच्या बदल्यात जयपूरचा राजा जयसिंह याला सरकारी (मोगलांच्या मालकीची) रिक्त भूमी देण्यात आली’, असा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून ताजमहाल म्हणजे मानसिंहमहल आहे, असाच याचा स्पष्ट अर्थ निघतो.
३. ‘मानसिंहमहल’ शहाजहांच्या नावाने खपवण्यासाठी लिखाण !
टॅव्हरनिए नावाच्या फ्रेंच हिरे व्यापार्याच्या प्रवासवर्णनामध्ये ताजमहालाविषयी खोटा इतिहास आढळतो. टॅव्हरनिए वर्ष १६४१ मध्ये भारतात आला. तो आला, तेव्हा ताजमहालच्या बांधकामाला प्रारंभ झाल्याचा उल्लेख त्याने केला आहे. ‘ताजमहाल बांधण्यासाठी २० सहस्र कामगारांनी २२ वर्षे काम केले’, असेही त्याने प्रवासवर्णनात लिहिले आहे. टॅव्हरनिए वर्ष १६४१ मध्ये भारतात आला आणि मुमताज हिचा मृत्यू वर्ष १६३१ मध्ये झाला, तर मग तिच्या मृत्यूनंतर १० वर्षांनी ताजमहाल बांधण्याला प्रारंभ झाला, असा याचा अर्थ होतो. बेगमचा मृत्यू झाल्यावर तिच्या कबरीवर १० वर्षांनी महाल बांधायला घेणे, हेच मुळात तर्कविसंगत दिसते. त्यामुळे हे लिखाण ‘मानसिंहमहल’ हा शहाजहां याच्या नावाने खपवण्यासाठी केल्याचेच दिसून येते.
आणखी कोणता पुरावा हवा ?

ताजमहालवरील नक्षीकामात असलेली ‘ॐ’, ‘शंखाकृती पाने’, ‘नागयुगले’, ‘त्रिशूळ’, ‘कमळे’, ‘घुमटावरील नारळाकृतीने मंडित सुवर्णकलश’, ‘थडग्याभोवतीच्या जाळीवरील कलश’ ही वैदिक संस्कृतीमधील शुभचिन्हे धडधडीत आहेत. कोणता मोगल बादशाह अशा प्रकारे स्वत: निर्माण केलेल्या वास्तूवर वैदिक चिन्हे कोरील ? असे शक्यच नाही. ‘ताजमहाल ही हिंदूंची वास्तू आहे’, यासाठी आणखी कोणत्या पुराव्याची आवश्यकता आहे ?
– श्री. प्रीतम नाचणकर
४. जनानखान्यात ५ सहस्र महिला आणि म्हणे मुमताजसाठी ताजमहाल !
शहाजहां याच्या अनेक पत्नींपैकी मुमताज ही एक होती. १४ व्या बाळंतपणात तिचा मृत्यू झाला. अनेक पत्नींच्या व्यतिरिक्त शहाजहांच्या जनानखान्यात युद्धात जिंकलेल्या अनेक स्त्रिया होत्या. अशा एैय्याशी आणि स्त्रीलंपट शहाजहांने बेगम मुमताज हिच्या प्रेमापोटी ताजमहालची निर्मिती केली, हीच मुळात भाकड कथा आहे. ‘ताजमहाल’ मुमताजवरील प्रेमाचे प्रतीक होते, तर त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख इतिहास कुठेतरी हवा. मुमताज हिच्या मृत्यूविषयी शहाजहांच्या दरबारातील बखरीत २ पानेही खर्ची घातलेली नाहीत; मात्र त्यानंतरच्या कथित इतिहासकारांनी मात्र ‘मुमताज हिच्या मृत्यूने शहाजहां ८ दिवस जेवला नाही, उदास होता’, अशा प्रकारची पानेच्या पाने लिहिली. बादशाहच्या चाटूगिरी व्यतिरिक्त याला काडीचाही आधार नाही. जनानखान्यात ५ सहस्र स्त्रिया बाळगणारा, स्वत:ची मोठी मुलगी जहानारा हिच्याशी अनैतिक संबंध ठेवणारा रंगेल आणि व्याभिचारी शहाजहां मुमताजसाठी ताजमहाल बांधेल, यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही; परंतु हा खोटा इतिहास काँग्रेसने भारतियांच्या माथी मारला.
५. खोट्या इतिहासाची कडी !
शहाजहां वर्ष १६२८ मध्ये गादीवर आला. स्वत:च्या प्रतिस्पर्धकांना ठार करून राजगादी बळकावणारा हा पहिला मोगल बादशाह. वर्ष १६५८ मध्ये बाप शहाजहां याला औरंगजेबाने बंदी बनवून कारागृहात टाकले. ताजमहालचे बांधकाम वर्ष १६४१ मध्ये चालू झाले असेल आणि ते पूर्ण व्हायला २२ वर्षे लागली असतील, तर वर्ष १६६३ पर्यंत पूर्ण व्हायला हवे; परंतु औरंगजेबाने शहाजहांला वर्ष १६५८ मध्ये कारागृहात टाकले असेल, तर ताजमहालचे काम पुढे ५ वर्षे औरंगजेबाने चालू ठेवले असते का ? ज्या औरंगजेबाने स्वत:च्या बापाला कारागृहात पाणीही पाजले नाही, त्याने बांधायला घेतलेली वास्तू औरंगजेबासारखा क्रूरकर्मा पूर्ण करणे कदापि शक्य नाही.
६. बळकावणे हाच यांचा इतिहास !
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ‘दुर्गाडी’ किल्ला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिले आरमार उभारले, त्या किल्ल्यावर श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. मंदिरात दुर्गादेवीची सुबक मूर्ती आहे. हे मंदिर म्हणजे ‘मशीद’ असल्याचा दावा स्थानिक मुसलमानांनी केला होता. वर्ष २०२४ मध्ये ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. मुसलमान कशा प्रकारे हिंदूंच्या वास्तू बळकावतात, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. पुण्यातील लोहगडावरील कबर, ठाणे जिल्ह्यातील मलंगगड अशा अनेक ठिकाणी मजार बांधून त्यांचे इस्लामीकरण केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. श्रीरामजन्मभूमी, काशी, मथुरा, लाल किल्ला, कुतूबमिनार, अजमेर दर्गा, जामा मशीद अशी असंख्य हिंदूंची स्थाने मुसलमानांनी अशाच प्रकारे बळकावली. या वास्तूंवर हिंदूंची अनेक प्रतिके असूनही काँग्रेसप्रणीत भारताच्या पुरातत्व विभागाने सत्य इतिहास दडपण्याचे काम केले.
७. …अन्यथा पुढील पिढी आपल्याला क्षमा करणार नाही !
मोगल आक्रमकांनी हिंदूंची धार्मिक स्थळे बळकावणे, हा केवळ त्या वास्तूवरील हक्कापुरते मर्यादित नाही, तर भविष्यातील राष्ट्रावरच हक्क सांगण्याच्या दिशेने पावले होती आणि ते काम त्यांचे वंशज कट्टरतेने करत आहेत. भारताच्या या इस्लामीकरणाची वाट काँग्रेसने आणखी प्रशस्त केली. मोगलांच्या क्रौर्याच्या इतिहासाकडे डोळेझाक करून काँग्रेस, पुरोगामी, साम्यवादी मंडळी हिंदूंना मात्र उठता-बसता असहिष्णुतेचे धडे देतात. पारतंत्र्य हे केवळ त्या काळापुरते मर्यादित रहात नाही, तर पुढील पिढीलाही कसे बाधित करते, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे पारतंत्र्याची चिन्हे नष्ट करून स्वत:ची प्रतिके पुन्हा प्राप्त करणे, हाच राष्ट्र आणि धर्म यांचा स्वाभिमान आहे. काँग्रेसने सत्तेसाठी जी लाचारी केली, ती चूक आताच्या सरकारने करू नये. हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर राष्ट्रासाठीही घातक ठरेल. भारतमातेला पारतंत्र्याचा हा धोंडा आता असह्य झाला आहे. केंद्र सरकारने तो दूर करावा आणि समस्त हिंदूंनी त्यासाठी लागेल ती किंमत मोजण्यासाठी सिद्ध व्हावे. अन्यथा पुढील पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. (३.११.२०२५)
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !