विदेशी अणू वैज्ञानिकाशी होते संबंध !

नवी देहली – पाकला गोपनीय माहिती पुरवल्यावरून देहली पोलिसांनी ५९ वर्षीय आदिल हुसेन याला अटक केली आहे. पोलिसांनी या अटकेनंतर एक मोठे हेरगिरी जाळे उघड केल्याचा दावा केला आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार हुसेन याचे एका परदेशी अणू वैज्ञानिकाशी संबंध होते आणि तो झारखंडमधील जमशेदपूर येथे चालणार्या बनावट (खोट्या) पारपत्र जाळ्याशीही जोडलेला होता. त्याला २ दिवसांपूर्वी देहलीच्या सीमापुरी भागातून अटक करण्यात आली. त्याने पाकिस्तानसह अनेक देशांत प्रवास केला होता.
Delhi Police arrest Mohammad Adil Hussaini from Delhi’s Seemapuri area for sharing secret information with Pakistan.
Adil had links with a foreign nuclear scientist. His brother Akhtar was arrested by Mumbai Police for similar espionage activities.
Both had multiple Indian… pic.twitter.com/oudBcNbvZp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2025
बनावट ओळखपत्रांचा वापर
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोदसिंह कुशवाह यांनी सांगितले की, आदिल जमशेदपूरमधील टाटा नगरचा रहिवासी आहे. त्याने आणि त्याच्या भावाने परदेशांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा अन् खोट्या कागदपत्रांद्वारे अनेक भारतीय पारपत्रे मिळवल्याचा संशय आहे. त्याचे संपूर्ण जाळे जमशेदपूर येथून चालवले जात होते, जिथे खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्रे आणि पारपत्रे बनवली जात होती.
मुंबई पोलिसांनी आदिलचा भाऊ अख्तर याला अटक केली असून त्याने अनेक आखाती देशांमध्ये प्रवास केला होता. त्याच्यावरही बनावट कागदपत्रांच्या आधारे एका संवेदनशील केंद्राचे ओळखपत्र मिळवल्याचा संशय आहे. या जाळ्याच्या माध्यमातून किती लोकांना खोटे पारपत्र दिले, हे पोलीस शोधत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना भर चौकात फासावर लटकवण्याची शिक्षा केली पाहिजे ! |
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !